मेहुनबारे पोलीसांकडून मोटार सायकल चोरास अटक.

प्रतिनिधी कल्पेश महाले (चाळिसगाव)
चाळीसगाव तालुक्यातील मेहूनबारे, चाळिसगाव शहर व ग्रामीण सह इतर भागात मोटरसायकल चोरीचे प्रकार मोठ्याने सुरू आहे. या चोरांना आळा घालावा यासाठी मेहुनबारे पोलीस स्टेशन च्या वतीने विविध योजना आखत चोरांना, अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात येत आहे.
असाच एक मोटार सायकल चोरीचा गुन्हा मेहुंनबारे पोलीसानी उघडकीस आनत आरोपीस पकडले आहे.
यावर सविस्तर बातमी अशी की, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांना गोपनीय मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन एक संशयित इसम नामे प्रतापसिंग दौलतसिंग गिरासे रा.सबगव्हाण ता.पारोळा जि.जळगाव हा या आपल्या परिसरात येऊन मोटरसायकल चोरी करून ते वाहन गावाकड विक्री करत आहे. अशी गोपनीय माहिती मिळाली होती.
सदर माहिती व घडत असलेला प्रकार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी मा.अप्पर पोलीस अधीक्षक सौ.कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिक्षक चाळीसगाव श्री.अभयसिंग देशमुख यांना कळविली असता त्यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी मेहुनबारे पोलीस स्टेशन चे मिलिंद शिंदे, गोरख चकोर, निलेश लोहार, भूषण बाविस्कर, सुदर्शन घुले व चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन चे शरद पाटील व नंदू महाजन असे पथक तयार करून रवाना केले होते.
सदर पथकाने संशयित आरोपी याचे गावी जाऊन गोपनीय माहिती घेतल्यावर सदर इसम हा त्याचे म्हशीचा गोठ्यामध्ये लपलेला आहे. याबाबत माहिती मिळाल्याने सदर पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन शोध घेऊन संशयित इसमास ताब्यात घेऊन मेहूनबारे पोलीस स्टेशनला आणून कसून चौकशी केली.
संशय असलेला इसम नामे प्रतापसिंग दवलतसिंग गिरासे वय 31 रा.सबगव्हाण ता.पारोळा जि.जळगाव असे सांगितले व त्याने नाशिक धुळे, व चाळीसगाव येथून एकूण पाच मोटर सायकल चोरल्याबाबत सांगितले त्याने सांगितलेल्या सर्व मोटरसायकल गाड्या त्याचे गावी जाऊन त्याने काढून दिलेल्या ताब्यात घेऊन मेहूनबारे पोलीस स्टेशन ला जमा केल्या आहे.
सदर आरोपी ची कसून चौकशी केली असता त्याने चौकशी दरम्यान चाळीसगाव शहरात देखील बसस्टँड परिसरात पल्सर चोरी केल्याची कबुली दिल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अभिलेख तपासला असता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे 258/23 भा.द.वी.379 प्रमाणे गुन्हा दाखल असून आरोपी व जप्त करण्यात आलेल्या गाड्या वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
सर्व परिसरातील नागरिकांकडून पोलीस विभागाचे या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे.