चाळीसगाव शहरातील एकूण ३५ केंद्रांवर पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
प्रतिनिधी कल्पेश महाले.
चाळीसगाव चाळीसगाव शहरातील विविध ठिकाणी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. नगरपालिका दवाखाना चाळीसगाव येथे उमंग च्या संस्थापिका संपदाताई पाटील यांच्या हस्ते पोलिओ डोस लसीकरण चा समारंभ झाला.
यावेळी यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत बोरसे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुराधा खैरनार, लेखापाल नामदेव पाटील, औषध निर्माता हर्षल पाटील, आरोग्य सेविका मोनाली सोनवणे, आरोग्यसेविका मनिषा पवार उपस्थित होते. आणि ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे डॉ.खतगावकर सहाय्यक संचालक नाशिक, डॉ. प्रसाद वाघ स्त्रीरोग तज्ञ वर्ग -१ जिल्हा रुग्णालय जळगाव यांनी पाहणी केली.
लसीकरण वेळी डॉ.मंदार करंबेळकर वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव डॉ. वैदेही करंबेळकर वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मेहूनबारे आरोग्यसेविका मानसी लोखंडे, आरोग्यसेविका रंजना जाधव उपस्थित होते.
तसेच के.आर.कोतकर कॉलेज येथील पोलिओ केंद्रावर नाशिक आरोग्य विभागातील सुधाकर भामरे आरोग्य सहाय्यक, सुनील गांगुर्डे आरोग्यसेवक, खरात आरोग्यसेवक, यांनी पाहणी केली असता यावेळी दिपक ठाकरे आरोग्यसेवक, तर कल्पना मराठे आरोग्यसेविका, वैशाली काटे आशासेविका, स्नेहल शिंदे अंगणवाडी मदतनीस उपस्थित होते.