
(उपसंपादक -कल्पेश महाले)
चाळीसगाव:- शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकीवरून जाणाऱ्या एका वाहन धारकाचा मोबाईल पडला होता. ही बाब या चौकात कार्यरत असलेले चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस रमेश दगा चौधरी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सदर मोबाईल सदर ताब्यात घेतला आणि शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप एकशिंगे यांना कळविले. सदर मोबाईल स्विच ऑफ झाला होता, तो मोबाईल चालू केला. रमेश चौधरी यांच्या सोबत कर्तव्यावर वाहतूक पोलीस अनिल पाटील व आबा वाघ उपस्थित होते. काही वेळानंतर मोबाईलधारक दिव्यांग व्यक्तीचा फोन त्या मोबाईल वर आल्यावर त्या व्यक्तीला कोर्ट जवळ बोलावून तो मोबाईल परत केला.
हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने त्या दिव्यांग वाहनधारकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्याने पोलीसांचे आभार मानले. कर्तव्य बजावत असताना असताना माणुसकीचे दर्शन दाखवणाऱ्या या वाहतुक पोलीसांचे कौतुक होत आहे.