चाळीसगाव शेतकी संघ येथे शेतमालाच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनीच लावली स्वतःहून शिस्त

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – येथील शेतकी संघाच्या कार्यालयात आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमीभावाने ज्वारी, बाजरी व मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली असून ती दि.३० एप्रिल पर्यंत चालू राहील, असे पणन मंडळाचे जिल्हा विपणन अधिकारी यांनी कळवले होते. ऑनलाईन नोंदणीच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना रात्री मुक्कामी राहावे लागले होते. मात्र सत्यकाम न्युज महाराष्ट्र यावर गैरसोयीची बातमी प्रसिद्ध होताच शेतकी संघाच्या वतीने दररोज ५० ते ६० शेतकऱ्यांची शेतमालाच्या नोंदणीसाठी स्वतःहून शिस्त लावली आहे. त्यामुळे एकाच वेळी गर्दी होत नसल्याने शेतकऱ्यांना सोयीचे झाले आहे त्यामुळे सर्व शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. आता पर्येंत २७५ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंद करण्यात आल्यात. शेतकऱ्यांनीच स्वताहून एक वही तयार केली आहे त्यात शेतकऱ्यांचे नाव लिहिली आहेत. आतापर्यंत त्या वहीत ६५० शेतकऱ्यांची नावे नोंदली गेली आहेत त्यापैकी २७५ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंद झाली आहे. पहिल्या दिवसापासून कळमडू येथील शेतकरी कृष्णराव सोनवणे हे शेतकऱ्यांना शिस्तीचे धडे देत असून स्वताहून शेतकऱ्यांना एका रांगेत राहण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
उपस्थित शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करताना शेतकी संघाचे कर्मचारी
यावेळी उपस्थित शेतकरी मोहन चौधरी खेडगाव, कृष्णराव सोनवणे कळमडू, काकासाहेब माळी पोहरे, अक्षय देशमुख चाळीसगाव, भैय्यासाहेब पाटील कळमडू, ईश्वर बोरसे दसकेबर्डी, किरण पाटील बोरखेडा, सुरेश माळी पोहरे, जिजबराव साळुंखे खेडगाव, ऑपरेटर सुजय देशमुख, शेतकी संघाचे कर्मचारी विकास शिसोदे, भैय्यासाहेब साळुंखे यावेळी नोंदणीसाठी उपस्थित होते.