सुटीवर आलेल्या कोळगाव येथील जवानाचा अपघातात दुर्दैवी मृत्यु..
सुटीवर आलेल्या कोळगाव येथील जवानाचा अपघातात दुर्दैवी मृत्यु..

सुटीवर आलेल्या कोळगाव येथील जवानाचा अपघातात दुर्दैवी मृत्यु..
प्रतिनिधी कलीम सैय्यद
भडगाव : तालुक्यातील कोळगाव येथील सुटीवर आलेल्या कोळगाव येथील जवानाचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना दिनांक ०२ डिसेंबर च्या रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान झाली.
मूळ कोळगाव येथील रहिवासी भूषण दिलीप महाजन हे दौंड पूणे येथे एस.आर.पी.एफ (SRPF) मध्ये कार्यरत होते. आपल्या लहान भावाच्या मुलीच्या वारसाच्या कार्यक्रमाला जवान भूषण महाजन हे सुटीवर आले होते.
काही कामा निमित्ताने जवान भूषण महाजन हे पारोळा मार्गाने जात असताना शनिवारी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान त्यांच्या दूचाकी चा अपघातात झाला. ही बातमी त्यांच्या भावाला व नातेवाईक मित्र परिवाराला मिळताच त्यांनी अपघात स्थळी धाव घेऊन भूषण महाजन यांना प्रथमोपचाराची चाळीसगाव येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, नंतर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. ही बातमी कोळगाव येथे कळताच चाळीसगाव रुग्णालयात गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
दिनांक ३ डिसेंबर रोजी पारोळा रोडवरील त्यांच्या शेतात मृत जवान भूषण महाजन यांचा पार्थिवाला त्यांच्या मुलाच्या हस्ते अग्निडाग देण्यात आला. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेत गावकऱ्यांनी तिरंगा धरून, अमर रहे, अमर रहे, भूषण महाजन अमर रहे अशा घोषणा देत शेवट चा निरोप त्यांना दिला.