चोरीची वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चाळीसगाव महसूल पथकाने पकडले

चोरीची वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चाळीसगाव महसूल पथकाने पकडले
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव:- तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथे दिनांक 20 मे रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास अवैधरित्या वाळू (गौणखनिज) वाहतूक करणारे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली श्री.कन्हैया देशमुख चाळीसगाव यांच्या मालकीचे आढळून आले. या ट्रॉली मध्ये सुमारे एक ते दीड ब्रास चोरीची वाळू दिसून आली असता, महसूल पथकातील श्री.सुनील पवार, मंडळ अधिकारी, श्री.प्रवीण महाजन, मंडळ अधिकारी, श्री.हर्षवर्धन मोरे तलाठी यांच्या पथकाने कारवाई करून शहर पोलीस स्टेशन येथे जमा करुन पंचनामा रिपोर्ट तहसील कार्यालय येथे सादर केलेला आहे.
सध्या चाळीसगाव शहरात आणि ग्रामीण भागात गिरणा नदीपात्रातून, मेहूनबारे, रहिपुरी, जामदा, वडगांव लांबे, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दररोज चोरीच्या वाळूचा उपसा चालू आहे.
शासनाचा लाखो रुपयांचा दररोज रॉयल्टी कर बुडवून गिरणा नदीपात्रातून, दररोज लाखो रुपयांची वाळू चोरली जात आहे.
यावर चाळीसगाव महसूल विभाग आणि चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण आणि मेहुनबारे पोलीस स्टेशन यांनी जास्तीत जास्त कडक कारवाई करुन वाळू चोरांवर आळा घालावा, अशी मागणी सर्व परिसरातील नागरिकांची होत आहे