कजगाव येथे लोकसभा निवडणूकीचे मतदान मोठ्या उत्साहात पार.

कजगाव येथे लोकसभा निवडणूकीचे मतदान मोठ्या उत्साहात पार.
कार्यकारी संपादक संजय महाजन
कजगाव येथे लोकसभा निवडणूकीचे मतदान मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडले सकाळपासून पाचही बुथवर मोठी गर्दी झाली होती मतदान ६०.३४ टक्के झाले असून त्यात तरुण वर्गाची व महिलांची विशेष टक्केवारी दिसून आली तर त्यात बूथ नंबर ३४ वर संध्याकाळीं पावणे आठ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली दिसून आली.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मतदानात मोठी वाढ झालेली दिसून आली. त्यांचे मुख्यकारण म्हणजे तरुणांचे व इतर झालेल्या नवीन नोंदणीमुळे मोठी वाढ झाल्याचे दिसून आले एकूण मतदान ६२६२ पैकी ३७७९ मतदान झाले असून शेवटच्या क्षणापर्यंत उत्साह कायम टिकून होता. तसेच दिवसभर विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याचे दिसून आल्याने मतदान केंद्राला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
यावेळी चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कविता नेरकर, भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, गोंदियाहुन आलेल्या पोलीस उपनिरीक्षक गीता मूळे, निवडणुकीचे सेक्टर ऑफिसर विजय पाटील,कजगाव चे पो. पा.राहुल पाटील, तलाठी चेतन बैरागी,पाच बीएलओ, पोलीस व होमगार्डचे दहा कर्मचारी,ग्रा.प.चे चार कर्मचारी, अंगणवाडीचे चौदा व आशा सेविकाचे सात,असा मोठा फौजफाटा निवडणूक कामी नियुक्त करण्यात आला होता.
बुथ क्रमांक ३४ वर संथ गतीने काम..
दरम्यान दिवसभर शांत झालेल्या मतदानात बूथ नंबर ३४ वर अत्यंत संथ गतीने कारभार चालल्याने मतदारांसह बाकी बुथवरील कर्मचारी यांच्यासह दोनशे लोकांना वेठीस धरण्यात आले. तब्बल पावणे आठ वाजेपर्यंत मतदान झाले असल्याने मोठी नाराजी व्यक्त केली जात होती.