गणेशपुर येथील लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत पाटील अपात्र

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – तालुक्यातील गणेशपुर ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत साहेबराव पाटील (देसले) यांनी गणेशपुर गावात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे सरकारी जागेवर विनापरवाना बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून पक्केशेड उभारून श्री गजानन वेल्डिंग वर्कशॉप या नावाने व्यवसाय करीत असून सदर अतिक्रमित जागेचा व्यवसाय कमी वापर एकत्रितपणे कुटुंबासह करीत असल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे 14 (ज – 3) अन्वये च्या तरतुदीचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांना ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच पदावरून अपात्र ठरविण्यात यावे यासाठी अर्जदार शशिकांत राजेंद्र पाटील व निलेश युवराज पाटील रा. गणेशपुर यांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली होती तसेच चंद्रकात साहेबराव पाटील यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याचे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चाळीसगांव यांच्या अहवालात नमूद आहे की, मौजे गणेशपुर ता.चाळीसगाव येथे विवादीत “गजानन वेल्डींग वर्कशॉप हे प्रजिमा-41 रस्त्यालगत आहे. स्त्याची एकूण अंदाजीत रुंदी 12 मी. आहे. रस्त्याच्या मध्यापासून दोघी बाजूस 6 मी रुंदी अपेक्षीत आहे. तरी, गजानन वेल्डींग वर्कशॉप चे बांधकाम पत्रयाचे असून शेडचा लॉखडी पोल रस्त्याच्या मध्यापासून 5.40 मी अतंरावर आहे.
ज्याअर्थी, सुनावणी दरम्यान तसेच दि.07.01.2025 रोजीच्या लेखी खुलाश्यात मान्य केले आहे की, प्रश्नाधीन जागा ही भाडयाने गणेशपुर ग्रामपंचायतकडून प्राप्त केली असून सदर जागेचे भाडयाच्या भरणा देखील केलेला आहे. तसेच किरकोळ मागणी नोंदवहीचे अवलोकन केले असता त्यामध्ये अ.क्र.4 वर चंद्रकात साहेबराव पाटील मौजे गणेशपुर ता.चाळीसगाव यांच्या नावाची नोंद असुन मागणी रु 400/- दिसुन येत आहे. तसेच त्यांना नमुना नं.7 सामान्य पावती देण्यात आलेली असुन त्यांनी त्यानुसार भरणा देखील केल्याचे दिसुन येत आहे. तसेच महावितरण महाराष्ट्रराज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत यांचे माहे डिसेंबर 2024 वीज पुरवठा देयकांचे अवलोकन केले असता ग्राहक क्रमांक 119960002935 ग्राहकांचे नांव चंद्रकात साहेबराव पाटील पत्ता- ग्रामपंचायत ठिकाण बस स्टॅण्ड 424101 असे दिसुन येत आहे. तसेचं उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चाळीसगांव यांच्या अहवालानुसार त्यांनी पत्रयाचे शेडचा काही भाग हा रस्त्यावर देखील अतिक्रमण केल्याचे नमुद केलेले आहे. यांचा अर्थ असा की, जागेवरील पत्रीशेड हे चंद्रकात साहेबराव पाटील मौजे गणेशपुर ता. चाळीसगाव यांच्या मालकीचे आहे. हे स्पष्ट होत आहे.उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चाळीसगांव, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, साक्षीदार व मंडळ अधिकारी, चाळीसगांव याचे स्थानिक पातळीवर चौकशी चे स्थळ निरीक्षण पंचनामा / अहवालानुसार सादर केलेल्या कागद पत्रे, सदर पत्राच्या शेडचे फोटो, भाडे भरणा केल्याच्या पावतीचे अवलोकन केले असता चंद्रकांत साहेबराव पाटील यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले असल्याचे सिध्द होत आहे. याचा अर्थ सदरची जागा ही शायकीय असल्याचे सिध्द होत आहे.
तसेच यांनी सदर पत्राचे शेड असलेले ठिकाण त्यांच्या स्वतःच्या मालकीचे तसेच अथवा वडीलोपार्जित मिळकत असल्याबाबत कोणताही शासकीय दस्तावेज किंवा पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे चंद्रकात साहेबराव पाटील यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले आहे. ही, बाब जिल्हाधिकारी यांच्या समोर निर्विवादपणे सिद्ध झाल्याने चंद्रकात साहेबराव पाटील, ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच/सदस्य मौजे गणेशपुर ता. चाळीसगांव जि. जळगांव हया महाराष्ट्र ग्रामंपचायत अधिनियम १९५९ चे कलम १४-ज-३ नुसार लोकनियुक्त सरपंच/सदस्य म्हणुन राहण्यास अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्याने जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गणेशपुर लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत साहेबराव पाटील यांना दिनांक 25 फेब्रुवारी रोजी अपात्र घोषित केले आहे.