कजगाव येथील विहिरीत आढळला अनोळखी तरुणीचा मृतदेह

का.संपादक – संजय महाजन
कजगाव – येथील कजगाव भडगाव मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या कजगाव शिवारातील वसंत श्रीधर अमृते यांच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे शेतकऱ्याचे लक्षात आल्याने या बाबत कजगाव चे पोलीस पाटील राहुल पाटील यांना कळविल्याने या बाबत भडगाव स्टेशन ला खबर दिल्याने भडगाव पोलीस स्टेशन चे पीएसआय सुशील सोनवणे यांच्यासह कजगाव बीटचे पोलीस नाईक नरेंद्र विसपुते व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मृत तरुणीचे साधारण वय २५ वर्षे असल्याचे समजते, या मृत तरुणीच्या डाव्या हाताच्या अंगठा वर मागील बाजूस इंग्रजीत पी गोंदलेला आहे. सदर घटनेबाबत भडगांव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या तरुणीची ओळख पटविण्याचे काम भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भडगांव पोलीस करीत आहेत.