बोदर्डे येथे सामूहिक जंतनिर्मूलन, लसीकरण व गोचीड मुक्त गोठा कार्यक्रम नुकताच संपन्न

बोदर्डे प्रतिनिधी – विलास पाटील
भडगांव – जळगाव जिल्हा दूध संघ, इंडियन इमोलॉजीकल लिमिटेड (NDDB) यांच्या संयुक्त विद्यमानाने भडगाव तालुक्यातील बोदर्डे दूध उत्पादक सहकारी संस्था बोदर्डे येथे लाईव्ह घेण्यात आला त्याप्रसंगी जळगाव दूध संघाचे चेअरमन तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मंगेश चव्हाण, प्रमुख पाहुणे आमदार किशोरआप्पा पाटील, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पराग मोरे, रावसाहेब भोसले, दूध संघाचे कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे आणि इंडियन एमोलॉजीकल लिमिटेड कंपनीचे झोनल मॅनेजर डेबोज्योती चटोपाध्याय संस्थेचे चेअरमन इंद्रजीत पाटील, सचिव वाल्मीक पाटील यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन 50% अनुदानावर जंतू निर्मूलनाच्या गोळ्यांचे वाटप केले व 100% अनुदानावर गोचीड मुक्त गोठा कार्यक्रम राबवला, त्यांचप्रमाणे आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी गावातील उत्कृष्ट दुधाळ गाय, कालवड व वासरी यांच्या मालकांनाचा देखील सन्मान करण्यात आला. संकलन विभागामार्फत असे विविध कार्यक्रम राबवण्यास सहकार्य करणाऱ्या सर्वांचे जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक संस्थांचे दूध उत्पादक, बोदर्डे संस्थेचे चेअरमन, सचिव व समस्त ग्रामस्थ दूध संघाचे सर्व विभाग प्रमुख यांचे जळगाव दूध संघातर्फे आभार मानण्यात आले.
दूध व्यवसायाला बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्हा दूध संघातर्फे दुधाळ जाणवरंचे सामूहिक जंतनिर्मूल, लसीकरण व गोचीड मुक्त गोठा कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमांतर्गत जिल्हातील ३३ गावातील दुध संस्थाच्या एकूण १२५३ दूध उत्पादकांनी सहभाग घेतला.