अमर संजीवनी ज्येष्ठ नागरीक संघाचा द्वितीय वर्धापन दिवस उत्साहात संपन्न
कार्यकारी संपादक – संजय महाजन
कजगाव – कजगाव येथील अमर संजीवनी ज्येष्ठ नागरीक संघ स्थापन होऊन दोन वर्ष पुर्ण झाले त्या निम्मित तसेच नियमित होत असलेली मासिक मीटिंग निम्मित संघाचे सारे ज्येष्ठ नागरीक संघाच्या पटांगणात एकत्रित जमत विविध विषयावर चर्चा करण्यात आली प्रसंगी संघाचे सचिव बी.के.पाटील यांनी संघाने दोन वर्षात केलेली प्रगती या बाबत लेखाजोखा मांडला नोव्हेंबर मध्ये ज्या सदस्याचा वाढदिवस साजरा झाला त्या साऱ्या सदस्यांचा संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संघाचे कार्यालय उभारणी साठी संघाचे ज्येष्ठ सदस्य डॉ.उत्तमराव पाटील यांनी एक लाख एक हजार रुपये तसेच संघाचे अध्यक्ष वसंतराव वामन शिनकर यांनी देखील एक लाख एक हजार रुपये देणगी संघास दिली तसेच भोरटेक येथील मूळ रहिवासी असलेले पाचोरा येथे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त शिक्षक एम.एस.महाजन यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त संघास पाच हजार शंभर रुपये देणगी दिली तिघ देणगीदार यांचे संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी संघाचे अध्यक्ष वसंतराव शिनकर,सचिव बी.के.पाटील सह सर्व संचालक कार्यक्रमाचे अध्यक्ष कजगाव चे सरपंच रघुनाथ महाजन, माऊली ज्येष्ठ नागरीक बहुउद्देशिय संस्था पाचोरा चे सचिव के.एस.महाजन सह संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.