पिसाळलेल्या कुत्र्याने दहा ते पंधरा नागरिकांचे लचके तोडल्याने कजगाव परिसरात घबराटीचे वातावरण
कार्यकारी संपादक – संजय महाजन
कजगाव – भडगाव तालुक्यातील कजगाव येथे दि.३० रोजी पिसाळलेल्या कुत्र्याने दहा ते पंधरा नागरिकांचे लचके तोडत जखमी केले सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
पिसाळलेल्या कुत्र्यास पिटाळून लावण्यासाठी अनेक तरुणांनी लाठ्या काठ्या घेत त्याचा पाठलाग केला मात्र पिसाळलेला कुत्रा लचके तोडतच असल्याने नागरिकात घबराट पसरली आहे काहि चावा घेतलेल्या जखमी पैकी शरद अभिनव पाटील वय ४६, भरत रामसिंग पाटील वय ५२, मोहन फकीरा महाजन वय ४५, गोपाल धनराज पाटील वय ५१, खुशी योगेश मिस्त्री वय ११ वर्ष यांचेवर कजगाव च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.दीप्ती मगर,डॉ.श्रीकांत मराठे,बेबी फराडके, नलु परदेशी,रमेश खैरनार यांनी उपचार केले दरम्यान गोपाल धनराज पाटील व मोहन फकिरा महाजन यांची चाव्याची जखम खोलवर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे तर काही जखमींनी खाजगी रुग्णालयात उपचार केले आहे.