Breaking
जळगाव

अनोळखी इसमाच्या मृतदेहवर मेहुणबारे पोलीसांच्या उपस्थितीत दफनविधी

0 5 3 3 8 6

उपसंपादक – कल्पेश महाले 

मेहुणबारे – दि. १६/११/२०२४ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मेहुणबारे पोलीस स्टेशन यांच्या हद्दीतील चाळीसगाव – मालेगाव रोडवरील पिलखोड गावाजवळ एक अनोळखी इसम आजारी अवस्थेत आढळून आल्याने मेहुनणबारे पोलीसांना माहिती मिळाली, मेहुणबारेे  पोलीसांच्या मदतीने त्या अनोळखी इसमास औषध उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ.राजेश लाटे यांनी उपचारासाठी सामान्य रुग्णालय मालेगाव येथे पाठविले.

सदर रुग्णावर सामान्य रुग्णालयांत औषध उपचार सुरु होते. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्यास डॉ.पोतदार यांनी तपासून दि.१७/११/२०२४ रोजी रात्री २:३० तपासून मयत घोषित केले. तरी सदर अनोळखी इसम हा सामान्य रुग्णालय मालेगाव येथे औषध उपचारादरम्यान मयत झाले असून अ.मृ.रजि.न. 84-24 प्रमाणे मेहुणबारे पोलीस स्टेशन येते दाखल झाला आहे.

वैद्यकिय अधिक्षक, वर्ग-१ सामान्य रुग्णालय मालेगांव, जि.नाशिक यांनी दि. १८/११/२०२४ रोजी पत्राद्वारे मेहुणबारे पोलीसांना याबाबतची माहिती कळवली असता चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली, मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या आदेशाने पिलखोड बीट चे पोलीस हवालदार मोहन सोनवणे यांच्या उपस्थितीत दि.१९/११/२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मालेगाव नगरपरिषद हद्दीतील मालेगाव कॅम्प भागात या अनोळखी इसमाच्या मृतदेहावर दफनविधी करण्यात आला.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 3 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे