जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिंदी येथे संविधान दिन साजरा
शिंदी प्रतिनीधी – वाल्मीक गरुड
शिंदी – दि.26 नोव्हेंबर 2024 रोजी चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी माजी पं स.सभापती बाळासाहेब राऊत, सुरेश आप्पा गजे तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब राऊत हे अध्यक्ष स्थानी होते व त्यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून नारळ फोडण्यात आले व सर्व शिक्षक व सदस्य यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती बागुल , गोरख वाघ, राजेंद्र वाघ, पाटील आणि देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी माहिती सांगितली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच संविधान दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना रंग भरणे स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वाटप करण्यात आले