Breaking
जळगाव

कजगाव येथील जगताप मेन्स पार्लरचे संचालक यांचे अपघाती निधन 

0 7 5 1 9 9

कार्यकारी संपादक – संजय महाजन

कजगाव – भडगाव तालुक्यातील कजगाव येथील रहिवाशी बापु सोमनाथ जगताप वय – ५७ हे नगरदेवळा येथे लग्न समारंभ साठी जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

येथील न्यु जगताप मेन्स पार्लर चे संचालक बापु सोमनाथ जगताप हे एका मोटरसायकल ने व त्यांचे दोन सुपुत्र मुन्ना जगताप व विकी जगताप हे दुसऱ्या मोटरसायकल ने दि.२६ रोजी रात्री साडेनऊ च्या दरम्यान नगरदेवळा येथे आयोजित नातेवाईकांच्या विवाह समारंभा साठी जात असताना कजगाव भडगाव मार्गावरील साईबाबा मंदिर च्या पुढे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर सह दोन ट्रॉली (जुगाड)हे अर्धवट रस्त्यात म्हणजे एक ट्रॉली रस्त्यावर एक ट्रॉली साईड पट्टीवर ट्रॅक्टर खड्ड्यात अशा पद्धतीने उभ्या ट्रॅक्टर मुळे तसेच समोरून पडणाऱ्या वाहनाच्या लख्ख प्रकाशा मुळे ट्रॅक्टर ला इंडिकेटर अथवा रेडियम नसल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली दिसुन न आल्याने बापु जगताप यांची मोटरसायकल सरळ ट्रॅक्टर ट्रॉलीवर जाऊन आदळल्याने जगताप हे गंभीर जखमी झाले काही अंतरावर असलेले दोघं मुलं तेथे पोहचल्या नंतर त्यांना वडिलांचा अपघात झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवून जगताप यांना उपचारा साठी चाळीसगांव येथे हलविले मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली होती सदर दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे दि.२७ रोजी दुपारी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे पच्यात आई,पत्नी,दोन मुलं सुना असा परिवार आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 1 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे