मंगेश चव्हाण यांना भविष्यात मोठी जबाबदारी – गृहमंत्री अमित शाह

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – नुकतीच आज दि.१३ नोव्हेंबर रोजी चाळीसगाव शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी काय म्हणाले गृहमंत्री अमित शाह बघा.
१. महायुती शासन शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार.
2. राज्यात महाआघाडीचा सुपडा साफ होणार
3. राज्यात शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे महायुतीचे सरकार येणार.
4. राहुल गांधी यांनी खोटे संविधान दाखवून संविधानाचा व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे. जनता त्यांना माफ करणार नाही.
5. एफडीए त देशात महाराष्ट्र एक नंबर.
6. लाडकी बहीण योजना २१०० रुपये मिळणार शेतकऱ्यांना १५ हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य सेवा
7. समृद्ध महाराष्ट्र काँग्रेस साठी एटीएम
8. महायुती सरकारसाठी मोदीजींनी तिजोरी कायम खुले ठेवले आहे.
9. मोदी सरकारने १० लाख कोटी रुपये राज्याला दिले आहेत. तर काँग्रेसने २००४ ते २०१४ या कालावधीत फक्त १ कोटी ९१ लक्ष रुपये दिले.
10. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शेतकरी यांचा महायुती शासन शासन सन्मान करेल बेरोजगारांना योग्य मोबदला देईल.
11. राहुल गांधी यांची चौथी पिढी ही ३७० हटवू शकत नाही.
12. महायुती शासनाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव दिले.
15. आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्याचा विशेष गौरव गमतीने म्हणाले माझ्या मतदारसंघात आमदार मंगेश चव्हाण यांची पुस्तिका पोचली तर !
16. अतिशय तरुण दमदार आमदार तुम्हाला मिळाला आहे .
17. चाळीसगावात दोन अडीच वर्षात केलेली विकास कामे ही खरोखर अभिनंदन ही आहे, त्यामुळे मतदारसंघातील तमाम जनतेचे मी अभिनंदन करतो.
18. एक व्हिजन व दुरदृष्टी असलेला असलेला नेता तुम्हाला मिळाला आहे विक्रमी मतांनी निवडून द्या.
19. मंगेश चव्हाण यांना भविष्यात मोठी जबाबदारी अमित शहा यांचे सुतावेच .
20. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती शासनाने कायमच भरभरून दिला आहे.
21. राज्यात सर्वत्र फिरलो, महाविकास आघाडी विरोधात जनतेचा रोष असून येणाऱ्या 23 नोव्हेंबरला राज्यात महायुतीचे सरकार येणार असा विश्वास केला व्यक्त.
आपण सगळे मंगेशदादाला निवडून द्या, मोठं करायची जबाबदारी आमची – गिरीश महाजन
आम्ही याअगोदर देखील एकाला असाच जीव लावला होता आणि आमदार, खासदार केला पक्षाने पण तो बेईमान निघाला असून गेल्या दहा वर्षांत त्यांने कोणतेच कामं केलें नाही म्हणून आम्ही गेल्या लोकसभा निवडणुकीत तिकिट नाकारले अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला. आपले उमेदवार आणि आमदार मंगेशदादा चव्हाण हे जनतेत राहणारे आणि मतदारसंघाच्या विकासासाठी व जनतेच्या भल्यासाठी भांडून निधी खेचून आणणारे आमदार असून सगळ्यात जास्त विकासनिधी जर जर कोणत्या आमदाराने आपल्या मतदारसंघात आणला असेल तर ते म्हणजे आमदार मंगेशदादा चव्हाण आहेत आणि म्हणून यावेळी पुन्हा तुम्ही मंगेश दादांना निवडून द्या त्यांना अजून मोठं करायची जबाबदारी आमची आहे असं म्हणत ना.महाजन यांनी मंगेश चव्हाण यांच्या विषयी भविष्यवाणी केली आहे.
चाळीसगाव येथे दुपारी २:३० वाजता अमित शाह यांचे सभास्थळी आगमन झाले. सुरुवातीला अमित शाह यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. नंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. आणि अमित शहा यांचे वारकरी फेटा, विना व चिपाळ्या देऊन सन्मान करण्यात आला. सुमारे ४० मिनिटं अमित शहा यांचे भाषण झाले. सभास्थळी सकाळी दहा वाजेपासून गर्दी व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सुमारे ४० ते ५० हजार जनसमुदाय उपस्थित होता, अतिशय भव्य असे विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गृहमंत्री यांचे प्रथमच चाळीसगाव जंगी स्वागत करण्यात आले. याठिकाणी भव्य व्यासपीठ, शहरात ठिकठिकाणी स्वागतासाठी नागरिकांची गर्दी होती, अमित शहा यांना ऐकण्यासाठी चाळीसगावकर रस्त्यावर आले होते, शहरातील विविध भागात पार्किंगची स्वतंत्र सोय, पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त होता, प्रशासनाची सर्व हालचालींवर नजर, शिवाजी महाराज चौक परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
यावेळी ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, खासदार स्मिताताई वाघ, माजी आमदार साहेबरावजी घोडे, पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार तथा शिवसेना महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील, पारोळा – एरंडोल विधानसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे, बंजारा टायगर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, रिपाईचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.