चाळीसगाव प्रीमियर लीगमधील लक्ष्मी इंटरप्राईजेस संघ विजयी

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – प्रथमच चाळीसगाव प्रीमियर लीग पर्व ३ चे आयोजन ७ नोव्हेंबर पासून ते १० नोव्हेंबर पर्यंत खेळवण्यात आले हे सामने नानासाहेब य.ना. चव्हाण महाविद्यालयच्या प्रांगणात दिवसा खेळण्यात आले सामन्यांमध्ये युट्युब लाईव्हचे प्रक्षेपण लाईव्ह व्हिजन जळगाव यांच्यामार्फत करण्यात आले चाळीसगाव क्रिकेट यांचा तर्फे प्रथम व तृतीय पारितोषिक व स्वर्गीय रमेशशेठ प्यारेलाल पुंशी यांच्या स्मरणार्थ राजजी पुंशी, (पुंशी कंट्रक्शन) यांच्या मार्फत द्वितीय क्रमांकाचे बक्षिसाचे आयोजन करण्यात आले.
उपांत पूर्वसामान्यांमध्ये लक्ष्मी इंटरप्राईजेस, स्वराज्य ११, एकविरा वॉरियर्स व शिवनेरी ११ हे चार संघांनी धडक मारली. अंतिम सामना लक्ष्मी इंटरप्राईजेस व स्वराज्य ११ यांच्यात खेळला गेला त्यात लक्ष्मी इंटरप्रायजेस संघाने विजय संपादन करून चाळीसगाव प्रीमियर लीग पर्व ३ चे विजय ते पद पटकाविले बक्षीस वितरण प्रसंगी डॉ.सी टी पवार, डॉ.संजय चव्हाण, एम वाय चव्हाण, सुरेशजी खेडकर (प्रियांका गॅस एजन्सी), वैभव पाटील ( गुजरात अंबुजा संचालक) प्रितेश कटारिया, राजेंद्र पाटील, शैलेश पाटील,डॉ प्रवीण भोकरे, आप्पासाहेब भालेराव, डॉ संतोष राठोड, उमेश पवार, सचिन आमले, फिरोज पठाण, निलेश पाटील, सर्वेश भोसले, हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत आठ संघाने सहभाग घेतला असून त्यात लक्ष्मी इंटरप्राईजेस, बी.आर.बी इलेव्हन, शिवनेरी इलेव्हन, आजाद फायटर, शैलेश दादा वॉरियर्स, एकविरा वॉरियर, स्वराज इलेव्हन, प्रांजल इलेव्हन या आठ संघांनी सहभाग घेतला होता सर्वोत्कृष्ट फलंदाज आकाश कोकाटे, सर्वोत्कृष्ट गोलंदाज सचिन स्वार, मॅन ऑफ द सिरीज प्रशांत जाधव व सर्वोत्कृष्ट खेळाडू गोकुळ सूर्यवंशी यांनी सन्मान चिन्ह व मेडल मिळवले. चाळीसगाव प्रीमियर लीग चे आयोजन राजेंद्र पाटील, सचिन स्वार, देवेंद्र दाभाडे, विनोद खैरनार, वैभव नेरकर, शुभम गवळी, विकी खैरनार, भिकन शेख, गोकुळ सूर्यवंशी, तुषार सोमवंशी व चाळीसगाव क्रिकेट क्लब यांचे अनमोल सहकार्य लाभले