
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता सदरची निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांचा द्वितीय प्रशिक्षण वर्ग आज दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी तेली मंगल कार्यालय , चाळीसगाव येथे श्री प्रमोद हिले, निवडणूक निर्णय अधिकारी, श्री प्रशांत पाटील तहसीलदार चाळीसगाव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, श्री प्रथमेश मोहोड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. सदर प्रशिक्षण वर्ग सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 2 ते 6 अशा दोन सत्रात पार पडला . सकाळ व दुपार सत्रात हजर व गैरहजर प्रशिक्षणार्थी खालीलप्रमाणे
PRO- 374
पैकी गैरहजर -11
FPO-374
पैकी गैरहजर -03
OPO 1-374
पैकी गैरहजर -07
OPO 2- 380
पैकी गैरहजर -02
पिंक बूथ -08
पैकी गैरहजर -00
PWD -12
पैकी गैरहजर -00
एकूण प्रशिक्षणास हजर-1522
गैरहजर -23
हजर -1499
टक्केवारी – 98.48%
सदरचा प्रशिक्षण वर्ग श्री प्रमोद हिले, निवडणूक निर्णय अधिकारी, श्री प्रशांत पाटील तहसीलदार चाळीसगाव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, श्री प्रथमेश मोहोड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. सदर प्रशिक्षण वर्ग सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 2 ते 6 अशा दोन सत्रात पार पडला.
सदर प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना यांना निवडणूक प्रक्रियेचे स्क्रीनवर सादरीकरण करण्यात आले . त्यानंतर मतदान अधिकारी यांना असलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. त्यानंतर मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक व मतदान यंत्र हाताळणे सर्व मतदान अधिकारी यांचे कडून करून घेण्यात आली. तसेच सदर प्रशिक्षणात गैरहजर मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांचे वर कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचे विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम नुसार सक्त कारवाई करण्यात येईल, असे माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले .सदर प्रशिक्षण वर्गास सर्व क्षेत्रीय अधिकारी , सर्व ग्राम महसूल अधिकारी हे उपस्थित होते.
सदरचा प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी निवडणूक नायब तहसीलदार डॉ संदेश निकुंभ, सुधीर बच्छाव सहाय्यक महसूल अधिकारी, श्री गणेश लोखंडे मंडळ अधिकारी खडकी भाग, श्री तूशांत अहिरे निवडणूक महसूल सहाय्यक आणि तहसील कार्यालयातील सर्व महसूल सहाय्यक व सहायक महसूल अधिकारी यांनी नियोजन केले.