ज्ञानज्योती बालसंस्कार क्रेंद्र तर्फे आयोजित स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी कलीम सैय्यद (खेडगाव)
खेडगाव – विद्यार्थ्यांचे मनोबल, बौद्धिक क्षमता, खेळाडू वृत्ती, स्टेज डेरींग सह बौद्धिक व शारिरीक दृष्ट्या विकास होण्यासाठी विविध प्रकारच्या खेळात उत्तम प्राधान्य, चालना मिळण्या करीत गेल्या महिन्यात ज्ञानज्योती बालसंस्कार क्रेंद्र खेडी – खेडगाव च्या वतीने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा यासारखे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले होते.
या स्पर्धेत पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक आलेल्या विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच सहभागी विदयार्थ्यानी सुद्धा चांगल्या प्रकारे कार्यक्रमात सहभाग घेत चांगला प्रयत्न केला होता. त्यामुळे प्रतेक स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
सदर हा सांस्कृतिक व बक्षीस वितरण सोहळा हा ज्ञानज्योती बालसंस्कार क्रेंद्र खेडी-खेडगाव शाळेचे अध्यक्ष प्रवीण इंद्रजीत देवरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक वर्गाने विशेष प्रयत्न करून हा बक्षीस वितरण कार्यक्रम यशस्वीरित्या उत्साहात पार पडला. त्यावेळी परमेश्वर (आबा) रावते, सोपान माळी, संजय धनगर, पंकज रावते, प्रेमानंद जाधव सर, निकिता महाजन मॅडम, सुषमा महाजन मॅडम, शाळेचे अध्यक्ष प्रविण देवरे सर, आणि पालक वर्ग व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेळोवेळी मुलांचा बौद्धिक व शारिरीक दृष्ट्या विकास होण्यासाठी ज्ञानज्योती बालसंस्कार क्रेंद्र तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन यापुढेही केले जातील असे यावेळी शाळेचे अध्यक्ष प्रविण देवरे सर यांनी यावेळी सत्यकाम न्युज चे प्रतिनिधी कलीम नवाब सैय्यद यांच्याशी बोलताना सांगितले.