कजगाव येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन

कजगाव येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन.
कार्यकारी संपादक – संजय महाजन
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे दिनांक २८ पासून ते ४ ऑगस्ट रोजी पर्यंत अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहला सुरुवात होत आहे. जीन परीसरातील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सात दिवस चालणाऱ्या अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह चे आयोजन संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून संत सावता महाराज माळी समाज मंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे
सकाळी ५ ते ६ काकडा आरती सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ व रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
दिनांक २८ जुलै रोजी वडिभोकर येथील हरी भक्त परायण मच्छिंद्र महाराज, २९ जुलै रोजी मालेगाव येथील ह.भ.प.चेतन महाराज, ३० जुलै रोजी करंजी येथील ह.भ.प. डॉ जलाल महाराज सय्यद, ३१ जुलै रोजी नरडाणे येथील ह.भ.प दत्तनाथ महाराज, १ ऑगस्ट रोजी जळगाव येथील ह.भ.प.मनोज महाराज, २ ऑगस्ट रोजी ब्राम्हणगाव येथील ह.भ.प.वाल्मीक महाराज, ३ ऑगस्ट रोजी टेकवाडे येथील कैलास महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते११ वाजेपर्यंत ह.भ.प. पारस महाराज जैन बनोटी, यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. काल्याच्या कीर्तन समाप्ती नंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी कीर्तन सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.