चाळीसगांव शहरातील महाराणा प्रताप चौक सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन समारंभ आज संपन्न होणार

चाळीसगांव शहरातील महाराणा प्रताप चौक सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन समारंभ आज संपन्न होणार
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या धुळे रोडवरील कॉलेज पॉईंट येथे महाराणा प्रतापसिंह चौकाच्या शिवशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज गुरुवार दिनांक १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:०० वाजता आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोर्याचे आमदार किशोर पाटील असतील. याप्रसंगी उपस्थितीचे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.
शहरातील धुळे रोडवरील मालेगाव व धुळे रोडच्या मध्यभागी महाराणा प्रतापसिंह चौक उभारण्यात येत आहे. यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणी चौकाचे सुशोभिकरण करून शासनाच्या माध्यमातून विजयस्तंभ उभारण्यासाठी आमदार चव्हाण हे प्रयत्नशील आहेत.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून नुकत्याच लोकार्पण झालेल्या भव्य दिव्य मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडलेली असतांनाच कॉलेज पॉईंट येथे महाराणा प्रताप सिंह चौक साकारला जाणार असून त्याच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ गुरुवार एक ऑगस्ट रोजी सायंकाळी संपन्न होणार आहे.