मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी चाळीसगांव तहसिलदारांना निवेदन

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी रोजी चाळीसगाव तालुक्यातील सर्व धर्मीय सर्वपक्षीय नागरिक यांनी चाळीसगाव तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हैवानालाही लाजवेल अशा निर्दयी आणि क्रुर हत्येचा खटला अति अति जलद न्यायालयात चालवून त्यांच्या सर्व मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्यावी तसेच हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हे ज्या धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय अगदी खासमखास आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे आणि त्या धनंजय मुंडे यांनी काल केस चा तपास पूर्ण झाल्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे म्हणजे तपास अधिकाऱ्यांवर तपास सुरू असताना पुरेपूर दबाव टाकून सर्व काही मनासारखे करून घेतले आणि मग राजीनामा दिला आहे म्हणून गरज पडल्यास या प्रकरणाचा तपास हा पुन्हा योग्य दिशेने केला जावा तपास कालावधीत तपास अधिकाऱ्यांना कोणी कोणी फोन केलेत त्याचा सीडीआर रिपोर्ट काढून दबाव आणणाऱ्याची नावे जाहीर करावी आणि त्यांचे वर कारवाई करावी मग तो कितीही मोठा राजकारणी नेता, मंत्री, पक्ष अध्यक्ष असो की कुणीही तरी जनभावना लक्षात घेऊन कारवाई करण्यात यावी अन्यथा जनक्षोभ होऊन जनमनातील आगीचा भडका होऊन महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही अशा आशयाचे निवेदन चाळीसगाव तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक लक्ष्मण शिरसाठ, सरपंच संघटनेचे किसनराव जोर्वेकर , शिवसेनेचे दिलीप पाटील सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब सोमवंशी, विठ्ठल राजपूत, आबासाहेब सैंदाणे, उदय पवार, घृष्णेश्वर पाटील, प्रदीप देशमुख, नितीन देशमुख, राकेश राखुंडे, चंद्रकांत ठाकरे, किशोर देशमुख, प्रदीप देशमुख, अनिल जाधव, छोटू पाटील, सुदर्शन देशमुख, अनिल चव्हाण, सागर निकम, उदय देशमुख, रवींद्र पाटील, भगवान पाटील, शैलेंद्रसिंग पाटील, दिवाकर महाले, अविनाश काकडे, मुकेश नेतकर, सचिन जाधव आदी उपस्थित होते.