डुकरांच्या हैदोसमुळे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान.

(कार्यकारी संपादक – संजय महाजन)
भडगाव:- कजगाव परिसरातील शेत शिवारात डूक्करांचा उपद्रवामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असुन भोरटेक शिवारातील भास्कर अमृतकार यांच्या शेतातील उभा मका व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने सदर शेतकऱ्याने भडगाव तहसीलदार,पंचायत समिती, ग्रामपंचायत कडे रितसर तक्रार दाखल केली असून उपद्रव मांडणाऱ्या डूक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आत्मदहनाचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांने दिला आहे.
या बाबत सवित्तर असे की, कजगाव येथील शेतकरी भास्कर गोपाळ अमृतकार व जयप्रकाश भास्कर अमृतकार यांची ७ एकर शेतजमीन ही भोरटेक शिवारात असून या ठिकाणी कपाशी व मकाची लागवड करण्यात आली आहे, मात्र या शिवारात रानडूकरांनी मोठा उपद्रव मांडल्याने तोंडी आलेल्या कपाशी व मक्याचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असल्याने सदरील शेतकऱ्याने डूक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी सरळ ग्रामपंचायत कजगाव, पंचायत समिती भडगाव यांचे कडे निवेदन दिले असुन बंदोबस्त न झाल्यास आत्मदहनाचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्याने दिला आहे.सदरील शेतकऱ्यांने रीतसर तक्रार दिल्याने कजगाव चे तलाठी यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून झालेल्या पिकनुकसानी बाबत शासनाकडून मला योग्य तो न्याय मिळावा अशी सदरील शेतकऱ्याची मागणी आहे.