पाटणा जंगलातील चंदन वृक्षाची चोरी करणारे दोन आरोपींना वनविभागाकडून अटक.

(उपसंपादक – कल्पेश महाले)
चाळीसगांव:- तालुक्यातील वनक्षेत्रांतर्गत (वन्यजीव) पाटणा या जंगल भागामध्ये वनरक्षक पाटणा व त्यांचे सहाय्यक रोजंदारी तत्त्वावरील वनसंरक्षण वनमजूर दि.१३/०९/२०२४ रोजी मध्यरात्री गस्त करीत असताना चंदनवृक्षाची तोड करणाऱ्या अज्ञात आरोपींची चाहूल लागली असता ठिकठिकाणी दबा धरून पाठलाग केला असता आठ चंदन तस्कर आरोपी दिसून आले त्यांना पकडण्यासाठी गेले असता, दोन आरोपींना पकडण्यात यश आले. तसेच त्यांच्याकडून २ नग कुऱ्हाड, २ लहान करवत, काळ्या रंगाची पिशवी त्यामध्ये स्वयंपाकाचे मसाले व इतर सामान तसेच ओल्या सालीसकट १३ किलो चंदन लाकूड माल सापडला तसेच आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे पिंटू वाल्मिकी गिरे वय -४४ वर्ष, शिवराम आबा मेंगाळ वय ३६ वर्ष, दोन्ही रा. गुजरदरी ता.चाळीसगांव येथील असून सदर आरोपींविरुद्ध वनरक्षक पाटणा यांनी प्रथम गुन्हा क्रमांक १३/२०२४ दि.१३/०९/२०२४ नुसार गुन्हा दाखल केला. चाळीसगाव वन्यजीव चौकशी अधिकारी वनक्षेत्रपाल एम.के.रहाटकळ यांनी चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली दरम्यान दि.१६/०९/२०२४ रोजी चौकशी अधिकारी यांनी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपी चाळीसगाव वन्यजीव परिक्षेत्रातील कर्मचारी यांच्यासह फरार व संशयित आरोपींचा शोध घेणे व तपास करणे कामी शोधमोहीम दरम्यान लोढरे (ठाकरवाडी) ता.नांदगाव जि. नाशिक येथे फरार आरोपी मच्छिंद्र विठ्ठल पोकळे, भाऊराव लक्ष्मण मेंगाळ, सुखदेव गणपत आव्हाळे हे घटनास्थळावरून फरार असल्याचे दिसून आले दरम्यान सर्च वॉरंट घेऊन आरोपी नामे सुखदेव गणपत आव्हाळे यांचे घराची तपासणी केली असता पथकास अनेक कुऱ्हाडी, सुरा, कोयता, पहार तसेच वन्यप्राणी शिकारीसाठी वापरासाठी घेण्यात येणारे साहित्य नायलॉनचे जाळे इत्यादी आढळून आले. सर्व हत्यार व साहित्य जप्त करण्यात आले त्यानंतर तपासणी पथकाचा मोर्चा गुजरदरी येथे गेला असता तेथे फरार आरोपी धनराज आबा मेंगाळ, शिवराम पिंटू गिरे, भाऊराव मच्छिंद्र मेंगाळ, लखन कडूबा मेंगाळ, सर्व रा.गुजरदरी यांची तपासणीकामे प्रत्यक्ष पाहणी केली असता आरोपी फरार झालेले दिसून आले.
दरम्यान अटक असलेला आरोपी पिंटू वाल्मिक गिरे याने वेळोवेळी गुन्हे कामे वापरलेली त्याचे स्वतःची दुचाकी वाहन क्रमांक MH 20 CZ 9589 जप्त करण्यात आली. सदर चंदन वृक्षतोड प्रकरणातील फरार आरोपी हे सर्व लोढरे (ठाकरवाडी) येथील ३ आरोपी व गुजरदरी येतील ४ आरोपी असे एकूण सात आरोपी फरार असून सदर सर्व आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९४७ चे कलम २६(१) इ, ड, आणि फ, कलम ४१ (२) वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम (२७) २७(३) व (४) कलम २९, ३१ जैवविविधता अधिनियम २००२ चे कलम ५६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(१) (२), ३(५), ३१७(२), ३२४(४) नुसार चाळीसगाव न्यायालयात खटला दाखल केला असून दोन्ही आरोपींना न्यायालयात दि. १७/०९/२०२४ रोजी हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सदर प्रकरणात कारवाईदरम्यान दोन आरोपी व मुद्देमाल हस्तगत करण्यात आले.
सदरची कारवाई एम.के. रहाटकळ वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव चाळीसगाव, गा.दे. चव्हाण वनपाल पाटणा, डी. के. जाधव वनपाल बोढरा, आर.जी. तडवी वनरक्षक पाटणा, पी.सी. कुलकर्णी वनरक्षक, ए.बी.मोरे विशेष वनरक्षक पाटणा, उमेश सोनवणे वनरक्षक पाटणा आणि रोजंदारी तत्वावरील संरक्षण मजूर रमेश राठोड,राजाराम चव्हाण, गोरख राठोड, वाल्मीक, संदीप पवार, अशोक, सचिन जाधव, वाहन चालक बाप्पू आगोने यांनी सहभाग घेतला होता असून पुढील कारवाई एम.बी.नाईकवाडे विभागीय वनअधिकारी(वन्यजीव)छत्रपती संभाजी नगर, विशाल लोंढे सहा.वनसंरक्षक(वन्यजीव) कन्नड यांच्या मार्गदर्शनाखाली एन.के.रहाटकळ वनपरिक्षेत्र अधिकारी(वन्यजीव)व इतर कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.