जामदा येथून चोरीची वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चाळीसगांव महसुल पथकाकडून जप्त

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव:- तालुक्यातील जामदा येथे रहिपुरी पुलाजवळ दिनांक 23 जून 2024 मंगळवार रोजी सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास जामदा येथील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर दिलीप पाटील, रा.जामदा ता. चाळीसगाव याच्या मालकीचे आढळून आले असता या ट्रॉली मध्ये सुमारे एक ते दीड ब्रास गिरणा नदीची वाळू दिसून आली. महसूल पथकातील श्री.विष्णू राठोड मंडळ अधिकारी बहाळ भाग, श्री.प्रकाश झाडे तलाठी बहाळ, श्री.अरुण निकम तलाठी रहिपुरी यांच्या पथकाने ही धडक कारवाई करून वाळूसह स्वराज कंपनीचे एक ट्रॅक्टर आणि एक ट्रॉली पोलीस कवायत मैदान चाळीसगाव येथे जमा करुन पंचनामा रिपोर्ट तहसील कार्यालय येथे सादर केलेला आहे. या कारवाईमुळे सर्व परिसरातील नागरिकांकडून या महसूल पथकाचे कौतुक होत आहे.
चाळीसगाव तालुक्यात गिरणा नदीमधून जामदा, रहिपुरी मेहुणबारे, वडगांव लांबे, या ठिकाणाहून दररोज मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होते.
चाळीसगाव महसूल विभागाने आजुन जास्तीत जास्त कडक कारवाई या जामदा,रहिपुरी, मेहुनबारे, वडगांव लांबे, या भागात कराव्यात अशी सर्व परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे.