मेहुनबारे-तिरपोळे रस्त्यावर गोरक्षकांनी वाचविले दोन गायीसह एक वासरूचे प्राण
मेहुनबारे-तिरपोळे रस्त्यावर गोरक्षकांनी वाचविले दोन गायीसह एक वासरूचे प्राण
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – मेहुनबारे येथील गोरक्षकांनी मेहुनबारे-तिरपोळे रस्त्यावर दोन गायीसह एक वासरूचे प्राण वाचविले.
सविस्तर बातमी अशी की, तालुक्यातील लोंढे गावातून चाळीसगावच्या दिशेने भरधाव वेगाने निळ्या रंगाची टाटा कंपनीची छोटा हत्ती गाडी बंदिस्त होती स्वरूपात जात होती.
काही गोरक्षकांना गाडी मधून गुरांचा आवाज आल्याने त्यांना गाडीमध्ये गुरे कोंबून नेत असल्याचा संशय आला. त्यामुळे गाडीमधून गाईंची वाहतुक करून ती गाडी लोंढे येथून मेहूनबारे च्या दिशेने भरधाव वेगात निघाली आहे अशी माहिती मेहूनबारे येथील गोरक्षक यांना मित्राने कॉल करून दिली.
त्यानंतर मेहुनबारे येथील भरत वाघ, विकी शितोळे, विरेंद्र राजपुत, खडकीसिम हे मेहुनबारे गावातील डेराबर्डी जवळ थांबले असता थोड्याच वेळात छोटा हत्ती गाडी गाई व वासरी भरलेली भरधाव वेगात आली. सदर छोटा हत्ती गाडी वरखेडे गावाकडे वळाली असता सदर वाहनाचा पाठलाग केला व मेहुनबारे गावाच्या बाहेर मारुती मंदिराजवळ गाडी थांबवली, त्यात दोन गाई व एका वासरू आढळून आले. त्यावरील चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव इम्रान खान रऊफखान, वय 25, रा.भोरस बु. ता.चाळीसगाव असे सांगितले.
सदर सविस्तर माहिती गडीचालक यांना विचारली असता, गाई व वासरू हे लोंढे ता.चाळीसगाव येथून शेतकरी कडून घेतलेली आहे व नागद ता.कन्नड येथे घेऊन जात आहे. ते कशासाठी घेऊन जात आहे याबाबत खात्रीशीर माहिती गाडीचालक यांनी सांगितली नाही. यावर गाडीचालक याला कोणत्या शेतकरी कडून विकत घेतले. यावर विचारणा केली असता, उडवा उडवी ची उत्तरे मिळू लागल्याने, सर्व गोरक्षक यांना संशय आल्याने त्यांनी लगेच पोलीस मदतीसाठी ११२ या हेल्पलाइन नंबर ला संपर्क केला थोड्याच वेळात मेहूनबारे पोलीस स्टेशनचे पो.कॉ. राकेश काळे हे मदतीसाठी आले. त्यांच्यासोबत सदर टाटा छोटा हत्ती मेहूनबारे पोलीस स्टेशन येथे नेऊन गाडी क्रमांक एम.एच.१९ बी.एम. ०८९३ या गाडीसह दोन गाई एक वासरू एकूण १,७५,०००/- रुपयांचा ऐवज पोलीसांनी जप्त करून १९६० कलम ११ (१) (ड), ११(१) ई, म १९८८, ६६, १९२ प्रमाणे गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक संदिप परदेशी आणि स.फौ.जालमसिंग पाटील करीत आहेत.