शिंदी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.सुरेखा ज्ञानेश्वर पिलोरे यांची बिनविरोध निवड.
शिंदी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.सुरेखा ज्ञानेश्वर पिलोरे यांची बिनविरोध निवड.
प्रतिनिधी लखन गरूड शिंदी
चाळिसगाव तालुक्यातील शिंदी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रगती पॅनल चे सौ.सुरेखा ज्ञानेश्वर पिलोरे यांची मंगळवार रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. सौ.सुरेखा पीलोरे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच, प्रगती पॅनल प्रमुख श्री सुरेश आप्पा गजे, भाऊसाहेब नाना नवले, गोकुळ वासुदेव फटांगरे, सह समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.
शिंदी ग्राम पंचायतीच्या सरपंच सरुबाई आप्पासाहेब जाधव यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ग्राम पंचायत शिंदी कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी सौ.सुरेखा ज्ञानेश्वर पिलोरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी सौ.सुरेखा ज्ञानेश्वर पिलोरे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी शिंदी ग्रामपंचायत ग्रामसेवक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत सौ.सुरेखा ज्ञानेश्वर पिलोरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ.सुरेखा ज्ञानेश्वर पिलोरे यांनी दिली आहे.