तीर्व उष्णतेच्या लाटेने खानदेशातील तील जनता हैराण

तीर्व उष्णतेच्या लाटेने खानदेशातील तील जनता हैराण
कार्यकारी संपादक संजय महाजन
कजगाव – उन्हाचे तापमान चांगलेच वाढले आहे, नागरीक आपली कामे सकाळी अकरा वाजेपर्यंत आपटून घेत असतात त्यामुळे भर दुपारी रस्ते पूर्ण ओसाड पडलेले दिसून येतात, जळगाव जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकत असून उष्णतेच्या लाटणे जळगाव जिल्हा हैराण झाला आहे रविवारी तर तापमान नवा उच्चांक गाठला, यदाच्या हंगामातील सर्वाधिक कमाल तापमानाचे ४४ अंशाचा टप्पा गाठला आहे , तापमान वाढीने प्रचंड उकाडा जाणवत आहे, मात्र अजून चार दिवस उष्णतेच्या लाट कायम राहणार असून यादरम्यान तापमान ४५ अंशावर जाण्याचा अंदाजा वर्तुण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून १९ ते २४ मे दरम्यान जळगाव जिल्हा सह संपूर्ण खानदेशात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तुण्यात आला आहे, येत्या तीन ते चार दिवसात पारा ४५ ते ४७ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे अशा परिस्थितीत सकाळी ११ वाजेपर्यंत घराबाहेरची कामे उरकून घेण्याची गरज आहे, तसेच दुपारच्या वेळेस घराबाहेर जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासन कडून करण्यात आले आहे.
२६ मे नंतर मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे ,