बहाळ गावाजवळील ऋषीपांथा येथील अरुंद पूलाने घेतला शेतकऱ्याचा बळी.

उपसंपादक कल्पेश महाले ( चाळिसगाव )
चाळीसगाव – तालुक्यातील बहाळ जवळील ऋषीपांथा येथील अरुंद पुलावरुन पडल्याने शेतकऱ्याचा जागीच बळी गेला. कसबे बहाळ येथील शेतकरी ६० वर्षीय भागवत रामराव धनगर हे आज सायंकाळी ७ ते ८ वाजेंच्या दरम्यान शेतीतून दुचाकीने घरी जात असताना समोरुन पुलावर बस आल्याने बसला साईड देताना, ऋषीपांथा येथील अरुंद पुलावरुन आपली दुचाकी बाजुला घेतांना तोल जाऊन दुचाकीसह पुलावरुन खाली पडल्याने यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
बहाळ गावातील अनेक नागरिकांनी, संघटनांनी अनेक वेळा या ऋषिपांथा येथील पुला संदर्भात अर्ज, तक्रारी लोकप्रतिनिधी यांच्याकडे केल्या होत्या. अनेक वेळा प्रसार माध्यमांमध्ये बातमी येऊन सुद्धा, लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारची दखल नघेतल्यामुळे ही घटना घडल्याचे नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
ऋषीपांथा येथील हा पुल ये जा करणाऱ्या नागरिकांना खुप धोकादायक आणि जिवघेणा आहे. या पुलाचे दोन्हीं सरंक्षण कठडे पुर आल्यावर वाहून गेले आहेत. तसेच या पुलाचा काही भाग जीर्ण झालेला आहे. तरीसुद्धा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या पुलाकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे अश्या घटना घडत आहेत. वेळोवेळी सत्यकाम न्युज च्या वतीने या पुलासंदर्भात वेळोवेळी बातमी प्रसारित करून सुद्धा प्रशासनाने व लोकप्रतिनिधी जनतेच्या मागणीकडे काना डोळा केल्याने, याच आठवड्यात ३ अपघात या पुलावर झाले आहेत. त्यात आज एक अपघात हा जीवघेणा ठरला यात नेमके दोषी कोण असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.