कुमावत बेलदार समाज सेवा संघ पाचोरा तालुका व गावपातळीवर कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न..
सत्यकाम न्युज महाराष्ट्र
पाचोरा – दिनांक 10 मार्च रोजी पाचोरा तालुका व गावपातळीवरील कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री श्रीकांत भाऊ परदेशी संस्थापक अध्यक्ष कुमावत बेलदार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य. प्रमुख अतिथी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (D.Y.S.P.)श्री धनंजयराव येरूळे. तसेच मा. उपाध्यक्षा क्षत्रिय कुमावत महासभा जयपूर सौ सविताताई किशोर कुमावत. तसेच मा. खान्देश विभाग प्रमुख दादासाहेब श्री शंकर विठ्ठल कुमावत. तसेच खान्देश विभाग युवा अध्यक्ष मा. श्री डिगंबर भगवान कुमावत. तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष मा. श्री विनोद (बापु) मोतीलाल कुमावत. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष पाचोरा तालुका मा आण्णासाहेब श्री शांताराम दगडू बेलदार. तसेच माजी अध्यक्ष मा. श्री रविंद्र नामदेवराव कुमावत. तसेच मा. श्री भारत सुभाष कुमावत (पोलिस मुख्यालय जळगाव डि. एस. बी. शाखा) तसेच पाचोरा तालुका महिला आघाडी च्या अध्यक्ष श्रीमती संगितात गजानन कुमावत तसेच पुरुष युवा अध्यक्ष पाचोरा मा श्री विलास रतिलाल कुमावत महिला युवा अध्यक्ष श्रीमती माधुरी नितीन कुमावत तसेच पाचोरा तालुका पुरूष आघाडी कार्याध्यक्ष मा. श्री संजयजी नामदेवराव कुमावत यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात मार्गदर्शन व प्रबोधन मा. आबासाहेब श्री कैलासजी कुमावत. तसेच पाचोरा तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष मा. आण्णासाहेब श्री शांताराम दगडू बेलदार. तसेच खेडगाव गावच्या सरपंच सोा मा सौ स्वाती कैलास कुमावत. तसेच श्रीमती मंजु रामलाल कुमावत. व कुमावत बेलदार समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा. श्री श्रीकांत भाऊ परदेशी यांनी केले.
तसेच भोजे चिंचपुरे येथील दिव्यांग बांधव श्री विठ्ठल कांतीलाल कुमावत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कुमावत बेलदार समाज सेवा संघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष मा. श्री विनोद (बापु) मोतीलाल कुमावत यांनी या बांधवास नविन कपडे (ड्रेस) देऊन सन्मानित केले.
सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने….
सदर पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमा नंतर सर्व समाज बांधवांनी व माता-भगिणी यांनी सुरूची भोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमात पाचोरा तालुका कुमावत बेलदार समाज सेवा संघाचे पुरूष/महिला आघाडी कार्यकारिणीचे सर्व सन्मानिय सदस्य व पदाधिकारी तसेच पाचोरा तालुका युवा पुरुष/महिला कार्यकारिणीचे सर्व सन्मानिय सदस्य व पदाधिकारी तसेच गाव पातळीवरील सर्व कार्यकारिणीचे सन्मानिय सदस्य व पदाधिकारी यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. श्री नारायण निवृत्ती कुमावत. मा. श्री अनिल रामसिंग बेलदार. मा. श्री निलेश लक्ष्मणराव कुमावत. यांनी केले. प्रस्ताविक मा. पाचोरा तालुका कार्यकारिणी सचिव श्री अनिल रामसिंग बेलदार यांनी केले. व आभार प्रदर्शन पाचोरा तालुका कार्यकारिणीचे सचिव मा. श्री अनिल रामसिंग बेलदार यांनी केले.