मेहुणबारे पोलीसांकडून जबरी चोरीचा गुन्हा उघड- आरोपी गजाआड.

चाळीसगाव ता. प्रतिनिधी कल्पेश महाले
दिनांक ०९/१२/२०२३ रोजी मेहुणबारे गावातील इसम नामे सुभाष सुकदेव माळी रा. जुनेगाव मेहुणबारे हे सकाळी ०९-०० वा. चे सुमारास घरुण कामावर जाण्याकरीता पाट कॉलनी भागातुन जात असतांना अज्ञात आरोपीताने त्यांचे हातातील मोबाईल हिसकावून घेवुन पळून गेला होता. त्याबाबत मेहुणबारे पोलीस ठाणेस दिनांक ११/१२/२०२३ रोजी गु.र.नं. ३२१/२०२३ भादवीक ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा केल्यापासुन आरोपी फरार झालेला होता. आरोपीच्या मिळालेल्या वर्णनानुसार मेहुणबारे पोलीसांचे पथक आरोपीताचा शोध घेत होते. सदरची घटना दिवसा घडल्याने व आरोपी फरार असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार झालेले होते. यातील फरार आरोपीचा शोध घेण्याचे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते.
मा. पोलीस अधीक्षक श्री एम राजकुमार, यांचे मागर्दशनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक श्री अभयसिंह देशमुख उपविभागीय पोलीस अधीकारी चाळीसगाव उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संदिप परदेशी, पोलीस उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस उप निरीक्षक रोहिदास माळी व पोहवा/देवा पाटील, पोना/प्रवीण पाटील, पोकों/सुदर्शन घुले, पोकॉ जितुसिंग परदेशी यांनी अहोरात्र मेहनत घेवुन मिळालेल्या गुप्त बातमी द्वारे एक इसम टेकवाडे येथे संशयीत रित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी तपास पथक जावुन संशयीत आरोपी नारायण ऊर्फ प्रकाश अनिल सुर्यवंशी वय ३० रा. इंदिरानगर मेहुणबारे यास दिनांक ११/१२/२०२३ रोजी टेकवाडे येथुन ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्याचे कब्जात गुन्हयातील ओपो कंपनीचा ६००० रुपये किमतीचा मोबाईल मिळून आल्याने सदरचा मुददेमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. आरोपीतास अटक करण्यात आली असुन पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक संदिप परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके हे करीत आहे.