बागबान विकास फाउंडेशन व अमन रोटरी फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमानाने नवीन मतदान नोंदणी व दुरुस्ती शिबिर संपन्न..

बागबान विकास फाउंडेशन व अमन रोटरी फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमानाने नवीन मतदान नोंदणी व दुरुस्ती शिबिर संपन्न..
जळगाव प्रतिनिधी
जळगाव दिनांक २९ ऑक्टोबर रोजी जळगाव सालार नगर येथे सकाळी १० वाजेपासून बागबान विकास फाउंडेशन व अमन रोटरी फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमानाने नवीन मतदान नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन बागबान विकास फाउंडेशन चे अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष वाईस ऑफ मीडिया ग्लोबल विंग डॉ. शरीफ बागवान यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सालार नगर भागातील नागरिकांनी नवीन मतदान कार्ड नोंदणी, स्मार्ट कार्ड वरील पत्ता,फोटो, नावात बदल, नवीन मतदान नोंदणीसाठी सकाळ पासूनच या गर्दी केली होती अक्षरशः शंभर च्या वर लोकांनी या नोंदणीचा लाभ घेतला. कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सालार नगर भागातील नागरिकांचे, इंजिनीयर सईद खाटीक, मोहसीन खान, एजाज शाह खान याचे विशेष सहकार्य मिळाले.
जळगाव शहरामध्ये अशाच पद्धतीचे मेहरून परिसर, शिवाजीनगर उस्मानिया पार्क, तांबापुरा, जोशी पेठ, बागवान मोहल्ला भागातील मतदारांची नोंदणी अभियाना द्वारे महिनाभर चालवले जाणार आहे याचा लाभ नागरिकांनी आवश्य घ्यावा असे आवाहन बागबान विकास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शरीफ बागवान यांनी केले आहे