माता-भगिनींनो आता संघटीत व्हा ! शेतकरी नेते सुनील देवरे

माता-भगिनींनो आता संघटीत व्हा ! शेतकरी नेते सुनील देवरे
सत्यकाम न्युज प्रतिनिधी.
पारोळा प्रतिनिधी – माझा शेतकरी रात्रंदिवस राब राब राबतो कष्ट करतो व्याजाने पैसे घेऊन शेतीत टाकतो. हे सर्व करत असताना त्याला मोठ्या कौतुकाने बळीराजा म्हटले जाते. पण हे फक्त बोलण्यापुरतेच आहे ! कारण शेती करत असताना बी-बियाणे, मजूर, विज, उत्पादन खर्च, शासनाचा हमीभाव याचा विचार केला तर या बळीराजाचा पुर्णपणे बळी दिला जातो. यात त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी माझी माता भगिनी चा कष्ट पणाला लागतात हे विसरून चालणार नाही.
म्हणून प्रत्येक गावा गावात तर शेतकरी संघटीत होत आहेतच पण आता माता-भगिनींनो तुम्ही ही संघटीत व्हावे असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले. ते महाळपुर येथे महिला व युवती आघाडी शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
की,शेतकऱ्यांच्या सुख-दुखात त्यांची पत्नी, आई आणि मुलगी खंभीरपणे उभी राहते, अगदी त्याच पध्दतीने आता आपण महिला आणि युवती आघाडीच्या माध्यमातून उभे राहायचे आहे. असे कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा कल्याणी देवरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
तर युवती आघाडी अध्यक्षा कुसुम बाविस्कर यांनी युवतींनी का यावे आणि संघटनेत संघटित होण्याचे काय फायदे होतात तसेच संकल्पांची माहिती दिली.
यावेळी पारोळा तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील, युवती तालुका अध्यक्ष कुसुम बाविस्कर, मुंदाणे शाखाध्यक्ष गितांजली पाटील, आशा पाटील, रक्षा बिर्हाडे
प्रशांत पाटील, कैलास पाटील, देवानंद पाटील, शिरसोदे येथील सामाजिक कार्यकर्त्या मेघना शिंपी, मायाबाई सोनवणे, वनिता संदाशिव यांच्या सह गावातील महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व पदाधिकारी यांनी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शेतकरी संघटनेची महिला आघाडीत शाखाध्यक्षा म्हणून संगिता पाटील, कार्याध्यक्ष म्हणून श्रीमती अर्चना पाटील, माहिती प्रमुख म्हणून सुवर्णा पाटील, उपाध्यक्ष म्हणून जनाबाई पाटील,
संपर्क प्रमुख म्हणून निर्मला पाटील, खजिनदार म्हणून भारती पाटील, महासचिव म्हणून सुरेखा बहिरम, सचिव म्हणून कलाबाई व्हाले, प्रसार माध्यम प्रमुख म्हणून संगिता पाटील, सल्लागार म्हणून योगिता पाटील, जेष्ठ मार्गदर्शक म्हणून मायाबाई पारधी, आरोग्य प्रमुख म्हणून मंगलबाई पाटील तर सदस्य म्हणून विमलबाई पाटील, रत्नाबाई पाटील यांना नियुक्त करण्यात आले.
महाराष्ट्र शेतकरी संघटनेची युवतीआघाडीत शाखाध्यक्षा म्हणून अश्विनी पारधी, कार्याध्यक्ष म्हणून विशाखा व्हाले, माहिती प्रमुख म्हणून अश्विनी सैंदाणे, उपाध्यक्ष म्हणून जया पारधी, संपर्क प्रमुख म्हणून प्रियंका व्हाले, खजिनदार म्हणून रोशनी पारधी यांची नियुक्ती करण्यात आली.