कासोदा येथील उपसरपंच पदी बुगदादबी शेख फिरोज यांची बिनविरोध निवड.

कासोदा येथील उपसरपंच पदी बुगदादबी शेख फिरोज यांची बिनविरोध निवड.
प्रतिनीधी इम्रान शेख.
कासोदा – येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी स्वर्गीय माजी सरपंच हाजी शेख मुसा शेख मुनीर उर्फ मुसा शेठ यांची सून बुकदाद बी शेख फिरोज यांची कासोदा ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या अगोदरचे उपसरपंच अर्शद अली मुक्तार आली यांनी १० ते १२ दिवस अगोदर राजीनामा दिल्यामुळे कासोदा ग्रामपंचायत उपसरपंच पद हे रिक्त झाले होते. त्यामुळे रिक्त उपसरपंच पदासाठी दिनांक १४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. यावेळी नवनियुक्त उपसरपंच बुगदादबी शेख फिरोज यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आले.
या मतदान वेळी सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य अब्दुल अजीज अब्दुल बारी तर निवडणूक अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी एस.पी.चव्हाण यांनी काम पाहिले.
नवनियुक्त उपसरपंच बुगदादबी शेख फिरोज यांची उपसरपंच पदी निवड झाल्याने त्यांचा मुलगा व गावातील, परिवारातील व्यक्तींनी, मोठा जल्लोष साजरा केला. नवनियुक्त उपसरपंच बुगदादबी शेख फिरोज यांचे सर्वच स्थारावरून अभिनंदन केले जात आहे.
स्वर्गीय हाजी शेख मुसा शेख मुनीर उर्फ मुसा शेठ यांनी कासोद्याचे आदर्श सरपंच म्हणून उत्तम कार्यकाळ पार पाडला होता. नवनियुक्त उपसरपंच बुगदादबी शेख फिरोज ही त्यांची सून आहे. त्यांनी आपला राजकीय पायंडा सुरू ठेवला आहे.