पाचोरा-लोहारा-जळगाव बससेवा सुरु करण्याबाबत विभाग नियंत्रक जळगाव यांना सामाजिक कार्यकर्ते शांताराम बेलदार यांचे निवेदन.

उपसंपादक – कल्पेश महाले
पाचोरा – तालुक्यातील लोहारा गावाची लोकसंख्या १५ ते २० हजार असून लोहारा येथुन जळगावला जाण्यासाठी विद्यार्थी-विदयार्थिनीं, जेष्ठ नागरीक सर्व प्रवाशांना सकाळी पाचोरा आगारातुन ७.१५ वाजता सुटणारी व लोहारा ता.पाचोरा येथे सकाळी ८.१५ ला पोहचणारी एस. टी. बस व परतिच्या प्रवासासाठी सांयकाळी जळगांव आगारातुन ५.०० वाजतां सुटणारी जळगांव-लोहारा-पाचोरा या मार्गावर बस सेवा सुमारे ८ दिवसांपासुन पाचोरा आगार प्रमुख यांनी सदर बससेवा बंद केलेली असून सध्या खांन्देश महोत्सव, अक्षय तृतीया (आखाजी) सणानिमीत्त सासरवासीण सर्व मातृ-भगिनी माहेराला जाण्यासाठी, सदर बस सेवा बंद केल्यामुळे या मार्गावर अवैध प्रवासी वाहतुन करणाऱ्या वाहन धारकांवर कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे या मार्गावर अवैध प्रवासी वाहतुक ही राजरोजपणे सुरू आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाजगी वाहनाने महिला प्रवाशी यांना कोंबुन-कोंबुन प्रवास करावा लागत असुन खाजगी वाहन चालकांची मनमानी व भाडे अव्वाच्या सव्वा घेत असल्याने प्रवाशांचे आर्थिक लूट होत असून सदर बस सेवा सुरू करण्याबाबत पाचोरा रा.प. आगार व्यवस्थापक प्रकाश पाटील यांची दि.०३/०५/२०२५ रोजी समक्ष मी भेट घेतली असता सदर आगार व्यवस्थापक यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली त्यात त्यांनी म्हटले की, एस. टी. बस संख्या कमी असल्या कारणाने व चार एस टी बस गाडया स्क्रॅप मध्ये दिलेल्या असल्याने तसेच सदर बसला प्रवासी संख्या कमी असल्या कारणाने सदर बस सेवा ही बंद करण्यात आलेली आहे.
तरी जळगांव-लोहारा-पाचोरा एस. टी. बस. दोन्ही फेऱ्या सदर वेळेत पुर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी शांताराम उर्फ आण्णा दगडु बेलदार रा.लोहारा यांनी भगवान जगनोर, विभाग नियंत्रक जळगाव, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शांताराम बेलदार यांनी दिलेला आहे.