प्राथमिक आरोग्य केंद्र कासोदा तर्फे “हिवताप दिन” साजरा.

प्रतिनिधी – इमरान शेख
कसोदा – राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दर वर्षी २५ एप्रिल हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या वर्षी हिवताप विभागा द्वारे प्रतिज्ञा व त्यातील थीम “चला हिवतापला संपवू या: पुन्हा योगदान द्या , पूनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा” याने सर्वांचे लक्ष वेधले होते.
कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रा द्वारे “हिवताप दिन ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम राबविण्याचे ठरवले असता आरोग्य पर्यवेक्षक श्री.भंगाळे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वेळोवेळी पाठपुरवा घेतला. यामध्ये विविध कार्यक्रम करुन हिवताप आजारा विषयी जनजागृति करण्यात आली. यामध्ये आरोग्य शिक्षण देण्यात आले तसेच कंटेनर सर्वेक्षण ,जलद ताप रुग्ण सर्वेक्षण इत्यादी कार्य करण्यात आले
मिलिंद गायकवाड आरोग्य निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वरील विविध सर्वेक्षण व जनजागृति विविध गावांमधे करण्यात आली. याप्रसंगी डॉ. पृथ्वीराज वाघ वैद्यकीय अधिकारी, हेमंत गढरी, शीला मनवर, राजेश पवार यांनी देखील वेळोवेळी सहकार्य केले.
आशा यांना बी.एस. बद्दल प्रशिक्षण दिले तसेच हिवताप विषयी माहीती देवून सामुहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. कासोदा प्रा.आ.केंद्र अंतर्गत येणारे उपकेंद्रा द्वारे देखील विविध कार्यक्रम राबविण्यात आले. यावेळी रघूनाथ पाटील, दिनेश जगदाळे, अतुल सोनवणे, नितीन खैरनार, अनिल पाटील या सर्व आरोग्य सेवक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शाळांना व भागात भेटी देऊन हिवताप विषयी माहिती दिली तसेच प्रतिज्ञा घेतली. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे महत्व पटवून दिले आरोग्य शिक्षण व जलजन्य आजारा पासून बचाव कसा करावा याची महीती दिली. आर.एस.पाटील आरोग्य सेवक व आशा यांनी मालखेडा व फरकांडे येथिल जि. प. शालेय विद्यार्थ्यांना हिवताप व स्वच्छता विषयी माहिती दिली व सामुहिक प्रतिज्ञा घेतली. सीमा पानपाटील व सारीका पाटील गटप्रवर्तक यांनी सर्व आशा यांना विविध कार्यक्रमाचे नियोजन करून त्यांना विविध गावामध्ये जाऊन हा कार्यक्रम राबविण्यास मदत केली.