महसूल भरारी पथकाची कारवाई ! वाळू ट्रॅक्टर पकडले.

प्रतिनिधी जितेंद्र चौधरी
जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात वाळूमाफियांचा मोठा धूडघूस सुरु असतांना आता प्रशासनाने कारवाई सुरु केली असून चाळीसगाव तालुक्यात महसूल भरारी पथकाने वाळू चोरीचे ट्रॅक्टर पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यात दि. ३ नोव्हेबर रोजी पहाटेच्या ३.३० वाजेच्या सुमारास प्रणव हिरालाल अमृतकर याच्या मालकीचे वाळूसह ट्रॅक्टर मेहुणबारे पोलीस स्टेशनला जमा केले. ही कारवाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव प्रांताधिकरी प्रमोद घुले, तहसीलदार प्रशांत पाटील, अप्पर तहसीलदार जगदीश भारकर, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, नायब तहसीलदार विकास लाडवांजरी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक मधील मंडळ अधिकारी पी. एस. महाजन, मंडळ अधिकारी सुनिल पवार, तलाठी सचिन हातोले, तलाठी अनिल निकम यांच्या पथकाने केली आहे. सर्वत्र चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांकडून या कारवाईचे कौतुक होत आहे.