
उपसंपादक – कल्पेश महाले
जळगांव – तक्रारदार पुरुष, वय-35 वर्षे, यांना त्यांच्या शेतात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गोठा शेड तयार करण्याचा कार्यारंभ आदेश देण्याचे मोबदल्यात आरोपी क्र.१) प्रविण दिपक चौधरी, वय- ३९ वर्ष, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, मनरेगा पंचायत समिती धरणगांव, रा.म्हसवे ता.पारोळा जि.जळगांव.(कंत्राटी सेवक) आरोपी क्र.२) उमेश किशोर पाटील, वय ३६ धंदा-नोकरी, तांत्रिक सहाय्यक, मनरेगा पंचायत समिती धरणगांव, रा.दोंदवाडे, तालुका चोपडा जिल्हा जळगाव.(कंत्राटी सेवक) यांनी तक्रारदार यांच्याकडे २०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १५००/- रू. लाचेची रक्कम स्विकारली तसेच आरोपी क्र.२ याने आरोपी क्र.१ याच्या सांगण्याप्रमाणे गोठा शेड बांधकाम करण्याच्या जागेची आखणी करून सदर जागेचे जीपीएस प्रणालीद्वारे फोटो काढण्यासाठी तक्रारदार यांचे शेतात जाण्याकरिता पेट्रोल पाण्याचे नावाखाली तक्रारदार यांचेकडून पैसे स्विकारण्यास कोणताही विरोध न दर्शवता मुकसंमती दर्शवून तक्रारदार यांना लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहीत केले म्हणून त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून नमुद आरोपी यांच्या विरुद्ध धरणगांव पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
सदरील कारवाई जळगांव ला.प्र.वि. विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ. राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन जळगांव एसीबीकडून करण्यात आले आहे.
अँन्टी करप्शन ब्युरो. जळगांव
दुरध्वनी क्रं. 0257-2235477
टोल फ्रि क्रं. 1064