जळगाव
भडगांव तालुक्यातील कोठली येथील जवान शहीद

0
7
5
5
6
1
बोदर्डे प्रतिनिधी – विलास पाटील
भडगांव – तालुक्यातील कोठली येथील भूमिपुत्र प्रवीण अभिमन्यू पाटील CRPF १३७ बटालियनचा जवानाचा उधमपूर येथे देशसेवा बजावताना वीर मरण आल्याची माहिती काल दिनांक १८ फेब्रुवारी सायंकाळी हाती आली आहे.
कोठली येथील जवान CRPF १३७ बटालियन उधमपूर येथे कार्यरत असताना गोळी लागलेल्या परिस्थितीत त्यांना विरमरण आले आहे. सुमारे १२ वर्षांपासून ते देशसेवेत कार्यरत होते. गेल्या आठवड्यात कोठली येथे आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन नातेवाईक व मित्र परिवार यांना भेटून ते कर्तव्यावर परतले होते. त्यातच अशी अचानक दुःखद वार्ता गावावर ऐकू आल्याने सर्वत्र शोकाकळा पसरली आहे,
त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ वहिनी, पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे, त्यांचे पार्थिव गावावर आण्यासाठी गावातील नातेवाईक रवाना झाले आहेत.
0
7
5
5
6
1