चाळीसगांव – भीषण अपघातात एक ठार, तीन गंभीर जखमी…

चाळीसगांव – भीषण अपघातात एक ठार, तीन गंभीर जखमी…
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – तालुक्यातील सायगांव येथील पेशंन्ट ज्ञानेश्वर हरी बच्छे, वय – २८ वर्ष यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे ओमनी ॲम्बुलन्स क्रमांक एम.एच १९ झेड ३६७० ने घेऊन जात असतांना कळवाडी फाट्या जवळील हॉटेल यश गार्डन समोर शुक्रवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मालेगांव कडून चाळीसगांवच्या दिशेने भरधाव येणारी टाटा कंपनीची हॅरियर कार क्रमांक एम.एच १९ सी. झेड ८१९१ ने ॲम्बुलन्सला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ॲम्बुलन्स मधील पेशंन्ट ज्ञानेश्वर हरी बच्छे, वय – २८ यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
ॲम्बुलन्स मधील सरुबाई करमचंद बोराडे वय – ३४ वर्ष रा. प्रभात कॉलनी चाळीसगांव, समाधान गुलाब बच्छे, वय – २७ वर्ष रा. सायगाव, ॲम्बुलन्स चालक प्रविण योगेश कोळी, वय – २४ वर्ष रा. पिलखोड हे गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावर पुढील उपचार नाशिक येथे सुरू आहेत.
झालेल्या अपघात ठिकाणाहून टाटा कंपनीची हॅरियर गाडीचा चालक घटनास्थळावरून फरार झालेला होता.
समाधान गुलाब बच्छे, वय २७ वर्ष रा.सायगाव यांच्या फिर्यादीवरून टाटा हॅरियर चालका विरुद्ध मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता नुसार कलम १०६ (१), १२५ अ, १२५ ब , मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १७७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
या अपघातातील मयत झालेले ह.भ.प. ज्ञानेश्वर हरी बच्छे (माऊली) हे संपूर्ण सायगाव पंचक्रोशीत उत्कृष्ट गायनाचार्य म्हणून प्रसिध्द होते.
या अपघातातील टाटा हॅरियर क्र. एम.एच १९ सी. झेड ८१९१ ही कार चाळीसगांव शहरातील आशीर्वाद हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नरेंद्र एस.राजपूत यांच्या मालकीची असल्याची समजते.
पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक २२५६ श्री.शैलेश बच्छाव करीत आहेत.