व्हॉईस ऑफ मीडियाच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी कल्पेश महाले यांची नियुक्ती.
कार्यकारी संपादक – संजय महाजन
जळगाव – जगात ४१ देशात, देशात नंबर १, लढा पत्रकार आणि पत्रकारितेसाठींचा फक्त पत्रकारांसाठी काम करणारी “व्हॉईस ऑफ मीडिया” या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी चाळीसगाव येथील कल्पेश विजय महाले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. पत्रकारांच्या व पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार आहोत. मूल्याधारित पत्रकारिता ही विचारधारा कायम राहावी, ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित रहावी, यासाठी आपण काम करणार आहोत.
सप्टेंबर मध्ये व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशन २०२४ शिर्डी येथे संपन्न झाले होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागातून उत्कृष्ट तालुकाध्यक्ष म्हणून चाळीसगाव तालुका अध्यक्ष कल्पेश महाले यांना “कार्य सेवा विशेष पुरस्कार सन्मान – २०२४” देऊन गौरवण्यात आले होते. व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी नुकतेच कल्पेश महाले यांना नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने कल्पेश महाले यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सर्व क्षेत्रातील विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.