उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – शहरातील मध्यवर्ती भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व कोर्ट समोर वाहतूक पोलीसांकडून वाहनांची व वाहनधारकांची तपासणी दरम्यान विना लायसन्स गाडी चालविणे, दारू पिऊन गाडी चालविणे, विना हेल्मेट गाडी चालविणे, ट्रिपल सीट गाडी चालविणे अश्या वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहन चालविण्यास देऊ नये असे आवाहन यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी केले आहे.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक एस.पी.बोरसे, हिराजी देशमुख, जगन्नाथ महाजन, भूषण पाटील, अनिल पाटील, मोरे, भालचंद्र भोसले, प्रताप पाटील, रमेश चौधरी यावेळी उपस्थित होते.
खालील कारवाई करण्यात आली.
◾ 52 केसेस, 43,900/- रुपये दंड वसुल (ट्रीपलसीट/अल्पवयीन मुले चालक/विना लायसेन्स)
◾ 3 ड्रंक ड्राईव्ह केसेस (दारु पिऊन वाहन चालविणे).
◾ 1 कर्कश आवाज बुलेट सायलेंसर जप्त कारवाई.