जळगावधुळेनंदुरबारमहाराष्ट्रराजकिय
चाळीसगाव येथे उद्या महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाणांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची विजय संकल्प सभा
0
5
3
3
2
6
उपसंपादक – कल्पेश महाले
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेचं भव्य आयोजन; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ.चव्हाण यांनी केले आवाहन
चाळीसगाव – चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री, सहकारमंत्री श्री.अमित शहा यांच्या सभेचे आयोजन दि.१३ बुधवार रोजी दुपारी १ वाजता करण्यात आले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या सभेचं भव्य असे नियोजन करण्यात आले असून तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.
0
5
3
3
2
6