Breaking
जळगावधुळेनंदुरबारमहाराष्ट्रराजकिय

सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी चाळीसगाव मतदारसंघ पिंजून काढत प्रचारात घेतली आघाडी, महिलांचा लक्षणीय सहभाग

0 5 3 3 8 8

उपसंपादक – कल्पेश महाले 

चाळीसगाव – भाजपा व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांनी अगोदरच प्रचारात आघाडी घेतली आहे. ते उमेदवार असले तरी मतदारसंघात त्यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई चव्हाण या देखील प्रचारात मागे नाहीत. प्रतिभाताई यांच्या प्रचाराची तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत त्यांनी जवळपास शहरी भागाबरोबरच संपूर्ण ग्रामीण भाग अक्षरशः पिंजून काढला आहे.

विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचारात सक्रीय झाले आहेत.अशातच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी अर्ज दाखल करण्या आगोदरच पहिल्या टप्प्यात चाळीसगाव शहराचा प्रचार दौरा पुर्ण करुन दुसऱ्या टप्प्यात आता ग्रामीण भागात जि.प. गटानूसार प्रत्येक घरोघरी जाऊन दुसऱ्या टप्प्यात देखील प्रचार पुर्णत्वास नेत आहेत. अशा प्रकारे त्यांनी महिला पदाधिकारी व विविध आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबतीने आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. सगळीकडे इतर उमेदवारांनी दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सुरू केला असतानाच सौ.प्रतिभाताईंनी मात्र प्रचार पुर्णत्वास नेत एकप्रकारे रेकॉर्ड स्थापन केले असून चाळीसगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात प्रतिभाताईंच्या प्रचाराचे व धडाडीचे कौतुक होत आहे.

यादरम्यान गावोगावी आणि घरोघरी महिला आणि तरुणींचा ताईंना भरभरून प्रतिसाद मिळत असून यावरुन दिसत आहे कि आमदार मंगेश चव्हाण यांनी लाडक्या बहिणींसाठी जे कार्य केले आहे त्याचीच ही फलश्रुती म्हणून सौ.प्रतिभाताई जवळ भावनिक होऊन अनेक माता भगिनीं आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. आणि आमदार मंगेशदादा चव्हाण व प्रतिभाताईंना भरभरून आशीर्वाद देत आहेत. त्यांच्यासोबत महिला आघाडीचा देखील मोठा व्यापक सहभाग प्रचारादरम्यान दिसून येत आहे. एक प्रकारे संपूर्ण तालुक्यात घरोघरी काम पोहोचवण्याचे काम प्रतिभाताई यांनी केले आहे.

“आ.मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्याच्या विकासात भरीव योगदान दिले असून या विकास कामांमुळेच जनता भरभरून विजयाचा आशीर्वाद देत आहे. सर्वच कार्यकर्ते यांच्याबरोबर सर्वसामान्य जनता महिला उस्फूर्त प्रचारात सहभागी होत आहेत.”

        – सौ.प्रतिभाताई चव्हाण

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 3 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे