Breaking
जळगावमहाराष्ट्रराजकिय

वाघळीचे माजी सरपंच विकास चौधरी यांचा महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा..!

0 7 5 0 2 5

उपसंपादक – कल्पेश महाले 

चाळीसगाव – चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी वाघळी गावाचे माजी सरपंच विकास चौधरी यांनी आपली माघार घेऊन भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठता दाखवत आ.मंगेश चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी विकासाचे व्हिजन घेऊन विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी तयारी सुरू केली होती. मात्र समाजातील प्रतिष्ठित व सन्माननीय ज्येष्ठांच्या मार्गदर्शन व सल्ल्यानुसार तसेच भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याने व आमदार मंगेश दादांचा जुना मित्र असून चाळीसगाव च्या विकासासाठी त्यांच्या असलेल्या धडपडीला साथ देण्यासाठी त्यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा देत असल्याचे विकास चौधरी यांनी स्पष्ट केले. माझ्या सर्व समर्थक व मित्र परिवाराने येत्या २० तारखेला महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्या कमळ या चिन्हापुढील बटण दाबून विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 0 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे