कासोदा येथे नाकाबंदी दरम्यान कासोदा पोलीसांकडून १ कोटी ४५ लाख रुपयांची रोकड जप्त.

तालुका प्रतिनिधी – इम्रान शेख
कासोदा – येथे मंगळवार दि.२२ ऑक्टोबर रोजी फरकांडे फाट्याजवळ केलेल्या नाकाबंदीत एरंडोल कडून येणाऱ्या एका गाडीत १ कोटी ४५ लाखांची रोकड तपासणी दरम्यान मिळून आली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नाकाबंदीत एरंडोल कडून येणारी पांढरी क्रेटा गाडीत सायंकाळी ५:३० ते ५:४५ दरम्यान फरकांड्या फाट्याजवळ तपासणी केली असता ५०० व १०० रुपयांच्या नोटा मिळून आल्याने सदर रकमेबाबत कारवाई करुन १ कोटी ४५ लाख रूपये जप्त करण्यात आले आहे. हि रक्कम पुढील कारवाईसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत ट्रेझरी शाखेत जमा केली आहे.
या संदर्भात कासोदा पोलीस स्टेशनचे स.पो.नि.निलेश राजपूत यांनी जप्त केलेली रक्कम येथीलच काझी नामक जिनिंग व्यावसायिकाची आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करीत असलेल्या कापसाच्या मोबदल्यासाठी ही रक्कम नेत होते असे संबंधित व्यावसायिकाने पोलीसांना सांगितले. त्यासंबंधी खातरजमाही करण्यात आली आहे. मात्र आचासंहितेच्या काळात एवढी रक्कम बाळगणे आचारसंहितेचे उल्लंघन असल्यामुळे याबाबत निवडणुक अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या चौकशी नंतरच खात्री झाल्यावर ही रक्कम संबंधित व्यावसायिकाला परत करण्यात येईल असे नाकाबंदी पथकाने माहिती दिली.
सदर कारवाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , उपअधीक्षक धनंजय येरुळे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जि.पी.एस.आय.सहदेव घुले, ए.एस.आय.रामकृष्ण पाटील, पो.ना.नंदलाल परदेशी , अकील मुजावर , पो.कॉ.समाधान तोंडे, लहू हटकर , नरेंद्र गजरे , ब्राम्हने आणि उपस्थित शासकीय पथक यांनी केली.