Breaking
जळगावधुळेनंदुरबारनाशिकमहाराष्ट्र

शिव पानंद शेतरस्त्यांच्या राज्यव्यापी पेरू वाटप आंदोलनाला मोठे यश

0 7 5 1 8 3

(उपसंपादक – कल्पेश महाले)

महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेरस्त्यांच्या प्रश्नांवर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर पुकारलेल्या पेरू वाटप आंदोलनासाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या असता त्यांनी आचारसंहिता संपताच डिसेंबर मध्ये जळगाव जिल्ह्यात महाराजस्व अभियान राबवण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांचे पेरू स्वीकारत आंदोलनाची दखल घेत तातडीने शेत रस्ते खुले करण्याचे आश्वासन देवून शेतकऱ्यांची मने जिंकली.

जळगाव:- जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवपानंद शेतरस्ते चळवळीच्या वतीने पेरू वाटप आंदोलन करण्यात आले त्यावेळी सन्माननीय जिल्हाधिकारीआयुष प्रसाद यांना शेतरस्ते खुले करण्यासाठी जाहीर निवेदन देवून चर्चा करत पेरू देत शेतकऱ्यांच्या पेरू आंदोलनाकडे लक्ष वेधन्यात आले तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्यात,वाटपपत्रात शेतरस्ता सक्तीचा करावा,शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी,शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्दीसाठी नंबरी लावुन त्यांचे नियोजित सर्वेक्षण करून नंबरी हटवणार यांना दंड सुरू करा ,शेतरस्त्याअभावी पडीक राहणाऱ्या शेत जमीन धारकांना विना अट नुकसान भरपाई देण्यात यावी त्याचबरोबर शिव रस्ते अतिक्रमण असल्यामुळे वाहतुकीयोग्य नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमध्ये वखरणी पेरणी मशागत व पेरणी कापणी उत्पादित पिक वाहतूक यासाठी यंत्रसामुग्री ट्रॅक्टर ट्रक ऊसाची ट्रक बैलगाडी टेम्पो इत्यादी साधने शेतात नेणे आणणे अवघड होत चालले आहे शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांकडे शेतरस्त्यासाठी विनंती अर्ज दाखल केलेले आहेत परंतु तहसीलदार कोणत्या प्रकारची निर्णय देत नाहीत महसूल अधिनियम 1966 च्या 143 कलम नुसार तहसीलदारांनी रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे परंतु तरीही संबंधित तालुक्यांच्या तहसीलदार शिवपानंद शेत रस्त्यांच्या हदद निश्चित करून शेतरस्ते खुले करत नाहीत म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मध्ये जनजागृती करत जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ११ ऑक्टोबर रोजी पेरू वाटप आंदोलन केले.

शेत व शिव पानंद रस्त्याच्या समस्या निवारणासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विशेषतः जामनेर, भडगाव, रावेर, चाळीसगाव आदी तालुक्यातील शेतकरी या शेतरस्त्यांच्या पेरू आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे अध्यक्ष शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील,जळगाव जिल्हा कृती समितीचे गणेश बाविस्कर, प्रताप धात्रक,प्रविण पाटील,सचिन चौधरी, बजरंग गोसावी,दिलीप पाटील,जगन कुमावत, भगवान पाटील,मुकेश जाधव,रामचंद्र आव्हाड, प्रकाश दौंड , राजेंद्र पाटील,समाधान पवार, शाम पाटील,पोपट पवार, विठोबा माळी, मुकेश जाधव विजय माळी आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे