Breaking
जळगावधुळे

चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पदी राजेशसिंह चंदेल.

0 7 5 1 4 4

(उपसंपादक – कल्पेश महाले)

चाळीसगांव:- नुकतेच काल १ ऑक्टोबर रोजी गृह विभागाने  नूतन १२ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाचे अवर सचिव संदीप गो. ढाकणे यांनी नुकतेच काढले. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगांव म्हणून, पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक राजेशसिंह अर्जुनसिंग चंदेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चाळीसगांव  नियुक्ती होण्यापुर्वी ते पुणे, मुंबई येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. राजेशसिंह चंदेल यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले आहे. मेहुणबारे येथे असतांना त्यांनी केलेल्या गुन्हे अन्वेषणाचे आणि पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल कायदा व सुव्यवस्थेचे वरिष्ठांकडून कौतुक झाले होते. त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली त्यानंतर त्यांची संभाजीनगर जिल्ह्यातील चापानगर येथे बदली झाली. पुढे त्यांच्या कामगिरीची दखल घेवून त्यांना बीड येथे एलसीबीचा पदभार देण्यात आला. त्यानंतर ते पुन्हा जळगांव जिल्ह्यात आले नंतर त्यांनी मुक्ताईनगर, जळगांव एलसीबी आणि जामनेर येथे पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर त्यांची पदोन्नती झाली. आता ते पुन्हा जळगांव जिल्ह्यात आले असून चाळीसगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून लवकरच पदभार स्विकारतील.

एक अत्यंत कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.  उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून ते निश्चीतपणे या तालुक्यातली वाढलेली गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात आणि आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्भयपणे काम करण्यास प्रोत्साहीत करतील. सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांची काही दिवसापूर्वी पुणे येथे बदली झाली होती. त्यांच्या रिक्त जागी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पोलीस दलात ही खांदेपालट झाली आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 1 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे