
(उपसंपादक – कल्पेश महाले)
मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी नोकरदार वर्गासह सर्वच क्षेत्रातील क्षेत्रातील कामगारांना पगारी सुट्टी राहील, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आयोगाने निवडणुकीच्या काळात एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या वाहनांवरही काही निर्बंध जारी करण्याचे संकेत दिलेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक दोन दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पथकाने विविध राजकीय पक्ष व इतर भागिदारांशी चर्चा करून त्यांची निवडणुकीशी संबंधित मते जाणून घेतली. त्यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राज्यात २६ नोव्हेंबरपूर्वी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे संकेत दिले. यावेळी त्यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नोकरदारांना व सर्वच क्षेत्रातील कामगार व मजुरांना पगारी सुट्टी घोषित करण्याचेही सूतोवाच केले.
राजीव कुमार म्हणाले की, मतदानाच्या दिवशी आपल्या कामाचा पडेल. यामुळे एक दिवसाचा पगार कापला जाईल अशी भीती नोकरदार व असंघटित क्षेत्रातील कामगारांना वाटते. त्यामुळे ते मतदानाऐवजी कामावर जाण्यास पसंती देतात. पण त्यांनी निवडणुकीसाठी पगार कापला जाण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. मतदानाच्या दिवशी सर्वांना पगारी सुट्टी असेल. त्यामुळे रोजंदारीवर किंवा कारखान्यांत कामाला जाणाऱ्या कामगारांनी कोणतीही भीती न बाळगता मतदानासाठी बाहेर यावे.
निवडणूक आयोगाची पगारी सुट्ट्यांविषयी सर्वच जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. या प्रकरणी ज्या संस्था पगारी सुट्टया देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई थेट कारवाई करण्याचे आदेश राहतील असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. आयोगाच्या या निर्णयामुळे कामगारांना दिलासा मिळणार आहे.
खर्चाची मर्यादा वाढणार नाही
निवडणुकीत सध्या खर्चाची मर्यादा 40 लाखांची मर्यादा आहे. खर्चाचे रेट अधिक असल्यामुळे निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवावी अशी विनंती पक्षांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबाबत विचार केला जाईल. खर्चाची लिमिट देशव्यापी असते. ती एका राज्यासाठी होत नाही. दोन ते तीन वर्षात आम्ही त्याचा रिव्ह्यू करतो. सध्या तरी खर्चाची मर्यादा तीच राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.