Breaking
जळगावधुळेमहाराष्ट्र

संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील 32 तांड्यांसाठी 4 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर

0 7 5 7 8 5

(उपसंपादक – कल्पेश महाले)

चाळीसगाव – तालुक्यातील तळागळातील घटकांपर्यंत विकास कामांना पोहचविण्याचे ध्येय घेऊन सुरू असलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकास कामाच्या संकल्पाला यश मिळाले असून चाळीसगाव तालुक्यातील 32 तांड्यांना 4 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या कर्तुत्वाने तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे सुरू आहे. तळागळातील घटकांपर्यंत विकास कामे पोहचावी यासाठी महायुतीचे सरकार देखील तात्काळ निर्णय घेत आहेत. दि 9 ऑक्टोंबर रोजी संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजनेतर्गत चाळीसगाव तालुक्यातील 32 तांड्यांना 4 कोटी 40 लक्ष निधी मंजूर झाला आहे. यामुळे शहर असो व मोठी गावे असो यात सुरू असलेली विकासकामे आता तांडे गाठत तांड्यांमध्ये मूलभूत सुविधा लवकरच पोहचणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेले तालुक्यातील 32 तांडे विकासाच्या प्रवाहात येणार आहे. तालुक्यातील उर्वरित इतर तांडे वस्ती यांनादेखील निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन असेही यावेळी आ.मंगेश चव्हाण म्हणाले.

4 कोटी 40 लाखांच्या विकास कामांकरिता निधी मंजूर झालेले 32 तांडे खालीलप्रमाणे

1 – परशराम नगर १० लाख,

2 – अंधारी तांडा १०लाख,

3 – खेरडे २० लाख,

4 – सुंदर नगर तांडा क्र. १ – १० लाख,

5 – हातगाव – १० लाख,

6 – ग्रुप रोकडे (वाघारी तांडा) १० लाख

7 – राजदेहरे गावठाण तांडा – २० लाख,

8 – चैतन्य तांडा ४ – १० लाख,

9 – चतुर्भुज तांडा – २० लाख,

10 – घोडेगाव – २० लाख,

11 – कृष्णापुरी – २० लाख,

12 – कृष्णनगर – २०लाख

13 – इच्छापूर तांडा नंबर ३ – २० लाख,

14 – इच्छापुर तांडा क्रमांक 2 – १०लाख,

15 – लोंजे आंबेहोळ – १०लाख,

16 – हातगाव तांडा – १० लाख,

17 – हतगाव तांडा – १०लाख,

18 – साईनगर लोणजे – १० लाख,

19 – साईनगर लोणजे – १० लाख,

20 – सांगवी तांडा – १०लाख,

21 – सांगवी तांडा – १०लाख,

22 – विसापुर तांडा – १० लाख,

23 – राजदेहरे से.मे. – २०लाख,

24 – जूनपानी तांडा – २०लाख,

25 – जूनपानी तांडा – २०लाख,

26 – चतुरभुज तांडा – १०लाख,

27 – चतुरभुज तांडा – १०लाख,

28 – घोडेगाव – १०लाख,

29 – गोरखपुर तांडा – २०लाख,

30 – गोरखपुर तांडा – १०लाख,

31 – कृष्णा पुरी तांडा – २०लाख,

32 – इच्छापूर तांडा – १० लाख.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 7 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे